राखी सावंत हिला होणार अटक? कोर्टात घेतली धाव, ते प्रकरण..

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत(family court) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही अधिक चर्चेत आलीये. राखी सावंत हिने मोठा खुलासा करत सांगितले होते की, आपण लग्न केले असून मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. राखी सावंत हिचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले होते. काही दिवसांनंतरच राखी सावंत हिने पतीवर गंभीर आरोप केले. हेच नाही तर राखीचा एक्स पती आदिल दुर्रानी खान याला काही दिवस जेलमध्ये राहण्याची देखील वेळ आली. यानंतर आदिल दुर्रानी याच्याकडूनही राखी सावंतवर गंभीर आरोप करण्यात आले.

आदिल दुर्रानी याने राखी सावंत(family court) हिच्यावर अश्लील व्हिडीओ लीक करण्याचा आरोप केला. हेच नाही तर हे प्रकरण आता थेट कोर्टापर्यंत जाऊन पोहचले आहे. 22 एप्रिलला राखी सावंतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आदिल दुर्रानी याचा आरोप आहे की, राखी सावंत हिने त्याचे अत्यंत खासगी व्हिडीओ हे व्हायरल केले आहेत. यावर त्याने एफआयआर देखील नोंदवली होती.

आता राखी सावंत हिला अटक होणार की, नाही हे उद्या 22 एप्रिलला स्पष्ट होईल. हायकोर्टात राखीने धाव घेतली. राखीच्या वकिलाचे म्हणणे आहे की, राखी हिची तब्येत खराब आहे. हेच नाही तर राखीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते, असेही तिच्या वकिलाने म्हटले आहे, तो व्हिडीओ पाच वर्षांच्या अगोदरचा असल्याचे देखील सांगितले जात आहे.

राखी सावंत हिच्यासोबतच्या वादानंतर काही दिवसांमध्ये आदिल दुर्रानी याने सोमी खान हिच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर आदिल दुर्रानी आणि सोमी खान हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या आयुष्याबद्दल खुलासे करताना दिसतात. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते, हेच नाही तर मारहाणीचाही आरोप तिने केला होता.

राखी सावंत हिच्या तक्रारीनंतर आदिल दुर्रानी काही दिवस जेलमध्येही होता. जेलच्या बाहेर आल्यानंतर आदिल दुर्रानी याने राखीवर गंभीर आरोप केले होते. मध्यंतरी राखी सावंत हिने म्हटले होते की, माझे काम खूप वाढले आहे. मला आयुष्यात एका पार्टनरची खूप जास्त गरज आहे. त्यानंतर चर्चा होती की, राखी सावंत ही परत एकदा लग्न करणार आहे. सतत दुबईला जाताना देखील राखी सावंत दिसते.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी ! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग; धुराचे प्रचंड लोट

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी; आरोग्य विम्यातून हटवली वयोमर्यादेची अट

गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका