भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत(political issue) (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. बुधवारी (23 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते कुडाळ येथे प्रवेश करणार आहेत आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना शिवसेनेकडू (शिंदे गट) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये(political issue) प्रवेश केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. तर, नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. निलेश राणे यांनी भाजपसाठीच काम करत होते.मात्र 19 १९ वर्षांनंतर राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
नीलेश राणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 2019 मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी मला लहान भावासारखं सांभाळलंय. मी उद्या दुपारी 4 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहे,” असं निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. “उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
तसेच उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेशाची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून आम्हाला 27 हजारांचं मताधिक्य मिळालं. 90 टक्के ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, कृषी सोसायटीवर आमची सत्ता आहे. त्यासह लोकसभेलाही आमचा खासदार निवडून आला आहे. महायुतीत आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या. विधानसभाही आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांपासून नीलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजपाची बांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले. कुडाळ मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांना 26 हजार 136 मतांचे बहुमत मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आग्रही राहिले होते. मात्र महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने, निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन धनुष्यबाणावर निवडणूकीत उतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :
सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…
मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर
नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणा