राहाला मल्याळम अंगाई गाऊन झोपवतो रणबीर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Celebrity) ही सध्या तिच्या ‘जिगरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पहिल्या दिवसांपासून या चित्रपटाची सगळ्यांना आतुरता आहे. आलिया भट्ट सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सगळ्यांसोबत दिसते. तर नुकतेच ते ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसले. आलियानं यावेळी तिच्या आणि रणबीरच्या बॉन्डविषयी मजेशीर गोष्टींता खुलासा केला. आलियानं सांगितलं की रणबीरनं राहासाठी मल्याळम लोरी गाणं शिकला.

आलिया भट्टनं(Celebrity) सांगितलं की रणबीर कपूरनं स्वत: चं एक नवा खेळ बनवला. त्यात तो राहासोबत खेळतो आणि त्यात दोन-दोन तास घालवतो. आलियाच्या म्हणण्यानुसार, राहासोबत रणबीर खूप अ‍ॅडव्हेंचर करतो आणि खूप क्रिएटिव्ह होतो. आलियानं सांगितलं, ‘राहा आणि रणबीरचं नातं अनेक जन्मांपासूनचं आहे असं वाटतं. तो राहाला बोलतो की तुला कपाटातल्या कपड्यांना हात लावून पाहायचं आहे? तर राहा हो बोलते. मग रणबीर, राहाला समजावतो की हे वेल्वेट आहे, हे कॉटन आहे. तर अशा प्रकारचे क्रिएटिव्ह खेळ खेळून तो तिला अनेक गोष्टी शिकवत असतो.’

आलियानं मग सांगितलं की रणबीरनं राहासाठी मल्याळम भाषेत एक अंगाई शिकली आणि ती ऐकूणच तो आमच्या मुलीला झोपवतो. ती म्हणाली, ‘रणबीर उन्नी वावा वो देखील गाते. हे एक मल्याळम अंगाई गीत आहे. आमची नर्स पहिल्या दिवसापासून राहाला हे अंगाई गीत ऐकवत होती. त्यामुळे राहा झोपायची, तर तो आता तेच करतो. मामा वावो, पापा वावो. हा तिचा झोप येते हे सांगण्याचा इशारा आहे. आता रणबीरनं तिच्यासाठी मल्याळम गाणं शिकलं.’

कपिल शर्मानं शोमध्ये संपूर्ण टीमसोबत मजेशीर गप्पा मारल्या त्यानंतर तो आलियाच्या या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला, लग्नाच्या आधी तिनं स्पाय थ्रिलर राजीमध्ये स्पायची भूमिका साकारली होती आणि लग्नानंतर ती स्पाय थ्रिलर अल्फामध्ये दिसणार आहे. कपिलनं आलियाला विचारलं की ‘आलिया, तुला काय वाटतं, मुली लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतर हेरगिरी करण्यात हुशार असतात का? मी सरळ मुद्यावर येतो की तू कधी रणबीर कपूरची हेरगिरी केली आहेस का?’ त्यावर उत्तर देत आलियानं सांगितलं की ‘मला कधीच त्याच्यावर हेरगिरी करण्याची गरज भासली नाही.’

हेही वाचा:

फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्…; धक्कादायक Video Viral

मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल…; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

‘मॅच सुरु असताना माझ्याकडे बघतच नाही’; पत्नीच्या तक्रारीवर रविचंद्रन अश्विनची फिरकी