“बेबी सिंबाचा डेब्यू चित्रपट…” रणवीर-दीपिकाच्या लेकीने जन्माआधीच केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटाची(new movie) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या १ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, रवि किशन आणि टायगर श्रॉफ उपस्थित होते. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी रणवीरने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटाच्या(new movie) ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी रणवीरने, त्याच्या मुलीचा ‘सिंघम रिटर्न’ चित्रपट पहिला असल्याचा तो म्हणाला आहे. चित्रपटाच्या शुटिंगवेळी दीपिका प्रेग्नेंट असल्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या लेकीचा तो तिचा पहिला चित्रपट आहे.
ट्रेलर लाँचवेळी रणवीर सिंग म्हणाला, “दीपिका बाळासोबत बिझी असल्यामुळे ती आज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला उपस्थित राहू शकली नाही. बाळाला संभाळण्याची माझी ड्युटी रात्रीची असल्यामुळे मी इव्हेंटला आलो आहे. चित्रपटात अनेक स्टार्स आहेत आणि मी सांगू इच्छितो की, माझ्या मुलीने म्हणजेच बेबी सिंबाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. कारण ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगवेळी दीपिका प्रेग्नेंट होती.”
आपल्या मुलीच्या डेब्यूबद्दल सांगताना रणवीर पुढे म्हणाला, “लेडी सिंघम (दीपिका), सिम्बा आणि बेबी सिम्बाकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ट्रेलरचा आनंद घ्या आणि तुमच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करा. आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.” चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ‘सिंघम रिटर्न’ चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने ट्रेलरवरूनच एक विक्रम केला आहे. ४ मिनिटांच्या ह्या ट्रेलरने रिलीज होताच विक्रम मोडला आहे.
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अजय देवगण, रणवीर सिंग, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, रवि किशन, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार सुद्धा आहे.
हेही वाचा :
बाईईईईईई हा काय प्रकार? गरबा खेळताना तरूणाचा अभ्यास…Video Viral
नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी: दहावी पास उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी