लंगडी घालत रश्मिका पोहोचली ‘छावा’च्या ट्रेलर लाँचला; जिद्द पाहून चाहते भारावले!
बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आणि या सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने लंगडी घालत हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी जीममध्ये झालेल्या दुखापतीमुळे तिच्या पायाला फॅक्चर झाले होते. असे असतानाही, ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर(trailer) लाँचसाठी ती खास हैदराबादहून मुंबईत आली होती. तिच्या या जिद्दीचे आणि व्यावसायिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईतील प्लाझा चित्रपटगृहात हा ट्रेलर(trailer) लाँच सोहळा पार पडला. यावेळी निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अभिनेता विकी कौशल, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर आदी कलाकार उपस्थित होते.
व्यासपीठावर येताच सर्वांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत त्यांच्या जिरेटोपाला फुले अर्पण केली. यावेळी रश्मिका लंगडत चालत व्यासपीठावर आली.
या चित्रपटात रश्मिका महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे तिला ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग देखील टाळावे लागले. मात्र, ‘छावा’ हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा असल्याने, ती खास ट्रेलर लाँचसाठी आली होती. रश्मिकाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रेलर लाँचवेळीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.
हेही वाचा :
अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल
रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूस झाले युद्धात मग्न… Video Viral
IPL 2025 पूर्वी एमएस धोनीने घेतले माता राणीचे दर्शन, रांचीच्या या मंदिराला दिली भेट