‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका

“एकाबाजूला मुडदे पडलेत. त्यांच्यासमोर देशाचे भाजपाचे नेते(political), कार्यवाहक पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करतात. हे किती असंवेदनशील आहे, ईशान्य मुंबईत राज ठाकरे, नारायण राणे सगळे आले. आम्ही त्यांना रस्त्यावर उतरवलं. घाम गाळावा लागला. राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते” अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

“भाजपाने अनेकांना भाड्यावर(political) घेतलय. त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतय. शाह आणि मोदींनी काय दिवे लावलेत, ज्या शाह-मोदींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही, अस बोलला होता. त्यांच्या पाखल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहतोय. आम्हाला वाईट वाटलं” असं संजय राऊत म्हणालेत.

शिवसेनेच्या एकूण वाटचालीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख हे पहिल्यांदा हाताच्या पंज्याला मतदान करतील. राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करतील या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “तो डुप्लीकेट धनुष्यबाण आहे. तो शिवसेनेचा नाही, बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाच चुंबन घेतायत. ते नकली ओठ आहेत”

“आम्ही ज्या पंज्याला मतदान करतोय, तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पंजा आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जास्त योगदान दिलय. ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं, त्या कमळाबाईने देशाची वाट लावली. महाराष्ट्र लुटला. म्हणून मविआ म्हणून एकत्र येऊन देश, संविधान वाचवण्यासाठी निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नाही. देश, संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. उद्धव ठाकरे पंजाला, तर अनेक काँग्रेस नेते मशाली, तुतारीला मतदान करतील” असं संजय राऊत म्हणाले.

“आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मविआ महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल. ज्यांना पराभवाची भीती वाटते, ते यंत्रणेचा दुरुपयोग करुन पैशाच वाटप करतायत” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

घाटकोपरमध्ये रामाचे बॅनर्स दिसतायत, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरवलय. रावण पण हिंदुत्ववादी होता. रावणाने सुद्धा विरोधकांना तुरुंगात टाकलेलं. रावणाने देवांना बंदीवान केलेलं, तरीही रावणाचा पराभव झाला. राम मैदानात उतरला, रावणाचा पराभव करण्यासाठी. रावण, कंस कोण? हे सांगण्याची गरज नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा :.

यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन

गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकर्‍यांसह नेते मंडळी पोहचले मतदानाला

मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट