रवीना टंडनला बनायचं होतं आयपीएस अधिकारी सलमान खानमुळे सोडावं लागलं स्वप्न

रवीना टंडन 90 च्या दशकात जेवढी लोकप्रिय अभिनेत्री होती तेवढीच ती (popular)आजही आहे. प्रेक्षकांच्या मनावार तिने नक्कीच राज्य केलं आहे. रवीना फक्त चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या स्पष्ट विचारांबद्दलही तेवढीच ओळखली जाते. अलीकडेच तिने यूपी पोलिसांच्या पॉडकास्ट “बियॉन्ड द बॅज” मध्ये तिचे अनेक अनुभव शेअर केले. महाकुंभ मेळ्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल आणि व्यवस्थेबद्दल तिने आपले विचारही व्यक्त केले.

या मुलाखतीत रवीना टंडनने अनेक गोष्टींबाबत तिचं मत माडलं आहे. तसेच तिच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नांबद्दलही तिने मन मोकळं केलं. ती म्हणाली तिला चित्रपटांमध्ये येण्यात काहीच रस नव्हता. ती म्हणाली, “माझे वडील इंडस्ट्रीत होते. मी नायिका होईन हे त्याच्या मनातही आले नव्हते आणि माझ्या मनातही आले नव्हते. तसेची मी तेव्हा हीरोइन टाइप मटेरियलही नव्हते. मात्र इतर लोक माझ्या वडिलांना म्हणायचे की तिला लाँच करा म्हणून. (popular)त्याच वेळी महेश भट्ट यांनी पूजा भट्टलाही

चित्रपटात लाँच केलं होतं.

रविनाने पुढे असेही सांगितलं की तिला आयपीएस व्हायचं होतं. तिच्या कुटुंबातील कोणीही विचार केला नव्हता की ती अभिनेत्री होईल. कारण ती किरण बेदींना आपलं प्रेरणास्थान मानते. तसेच ती म्हणाली की, “पण मला आयपीएस व्हायला रस होता. मी त्यावेळी किरण बेदींचा चाहता होतो. ती खूप धाडसी व्यक्तिमत्वाची होती. आम्ही त्यांच्या गोष्टी ऐकायचो, म्हणून मी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचो, त्यामुळे मी ठरवलं होतं की पदवीनंतर मी आयपीएस होईन. पण आता चित्रपटांच्या माध्यमातून जीवनात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळतेय हेही महत्त्वाचं आहे.” असं म्हणत तिने आपलं आयपीएस होण्याचं स्वप्न अधर्वट राहिल्याचं सांगितलं.

रवीना टंडन पुढे म्हणाली, “आता आपण या अभिनेत्याच्या आयुष्याद्वारे दुसरे जीवन जगू शकतो, जी एकेकाळी आपली इच्छा होती. पण माझ्यासोबत ते आपोआप घडले. लोक माझ्याकडे यायचे. (popular)मला चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. मी प्रत्येकवेळी त्या चित्रपटांसाठी नाही म्हणायचे. पण नंतर मला सलमान खानसोबत ‘पत्थर के फूल’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले आणि माझ्या मित्रांना सांगितलं की गेस करा मला कोणाच्या चित्रपटाची ऑफर आली असेल”

सलमानसोबत चित्रपट ऑफर झाला आणि सगळंच पाठीमागे राहिलं रवीना टंडन पुढे म्हणाली, “ जेव्हा माझ्या मित्रांना समजलं की मला सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितले की कृपया त्या चित्रपटाला नकार देऊ नको. तू सलमान खानसोबत काम करायला हो म्हण. आम्हालाही सलमानला भेटायला मिळेल. हा चित्रपट कर आणि हवं तर तू नंतर ही इंडस्ट्री सोडून दे. अखेर मी बाबांना विचारलं की मी या चित्रपटाला हो म्हणण्याचा विचार करत आहे. मग त्यांनी ते करण्याची परवानगी दिली. आणि मी हा चित्रपट केला.”

हेही वाचा :

ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी

सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार