हातात बेड्या अन् पायांत साखळदंड, अवैध प्रवाशांचं वास्तव.. व्हाइट हाउसनेच जारी केला Video

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासूच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला डोकेदुखी ठरतील असे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काही निर्णयांचा भारतालाही त्रास होऊ लागला आहे. अवैध प्रवाशांच्या बाबतीत आता ट्रम्प(Passengers) सरकारने कठोर धोरण अवलंबले आहे.

भारतासह अन्य देशांच्या अवैध प्रवाशांना(Passengers) पुन्हा त्यांच्या घरी धाडण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत तीन विमाने आली आहेत. हातात बेड्या असलेल्या भारतीय लोकांचे व्हिडिओ आणि फोटो पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. यातच आता व्हाइट हाऊसनचे अवैध प्रवाशांचा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे.

व्हाइट हाऊसच्या अधिकृत पेजवरू हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. साधारण 41 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यात डिपोर्ट करण्यासाठी प्रवाशांना तयार केले जात असल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकारीही दिसत आहेत. अधिकाऱ्याकडून प्रवाशांना बेड्या घातल्या जात आहेत. विमानतळावर बेड्या आणि साखळदंड दिसून येत आहेत. या व्हिडिओत प्रवाशांचे चेहरे मात्र दिसत नाहीत. परंतु, या प्रवाशाच्या हातात आणि पायांत बेड्या दिसत आहेत. एका अन्य क्लिपमध्ये एका व्यक्ती विमानात चढताना दिसत आहे. त्याच्या पायांतही बेड्या आहेत.

अवैध प्रवाशांना(Passengers) घेऊन अमेरिकेहून येणारे पहिले विमान 5 फेब्रुवारीला भारतात पोहोचले होते. अमेरिकी सी 147 विमानात 104 प्रवासी होते. हे विमान अमृतसर येथे उतरले होते. या प्रवाशांना मेक्सिको सीमेवरून पकडण्यात आले होते. हे प्रवासी भारतातून वैध पद्धतीनेच निघाले होते. नंतर मात्र या लोकांनी डंकी रुटने चुकीच्या पद्धतीने अमेरिकेत दाखल होण्याचा प्रयत्न केला.

या विमानात पंजाबचे 30, हरियाणाचे 33, गुजरातचे 33, महाराष्ट्राचे 3, उत्तर प्रदेशचे 3 तर चंदीगडचे 2 लोक होते. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी दुसरे विमान भारतात दाखल झाले. या विमानात 120 प्रवासी होते. यात पंजाबचे 60 आणि हरियाणातील 30 पेक्षा जास्त प्रवासी होते. या व्यतिरिक्त गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्यांतीलही प्रवासी होते.

यानंतर 16 फेब्रुवारी रोजी तिसरे विमान भारतात दाखल झाले. या विमानात जवळपास 112 प्रवासी होते. या लोकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले. अमेरिका सरकारकडून सैन्य विमानांचा वापर केला जात आहे. याआधी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास या देशांच्या अवैध प्रवाशांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रपती होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात मोठा डिपोर्टेशन प्रोग्राम सुरू केला आहे. या अंतर्गत ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. मागील आठवड्यात ब्लूमबर्गने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात म्हटले होते की भारत आणि अमेरिकेने जवळपास 18 हजार अवैध प्रवाशांची ओळख केली आहे.

हेही वाचा :

‘छावा’ चित्रपटादरम्यान प्रेक्षकाचा राडा; थेट सिनेमागृहाचा पडदाच फाडला!

अखेर प्रतिक्षा संपली! आज लाँच होणार Apple चा स्वस्त iPhone

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींना मिळणार श्रीगणेशाचा आशीर्वाद