रेल्वे विभागात 4095 जागांसाठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

 रेल्वे विभागातनोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी (recruitment agencies)आहे. नुकतीच उत्तर रेल्वेने अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली. उत्तर रेल्वेच्या विविध विभाग/युनिट्स/वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी 4096 अप्रेंटिसकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची फी किती, रिक्त जागा आणि पदांची संख्या, अर्ज कसा करायचा? याच विषयी जाणून घेऊ.

पदांची संख्या-
या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 4,095 रिक्त जागा भरणार आहे.

शैक्षणिक पात्रता-
उमेदवार किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच अप्रेंटिसशिपसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे.

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू(recruitment agencies)शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरणे गरजेचं आहे. भरतीचे अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे, नोव्हेंबर 2024 मध्ये गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

वय मर्यादा-
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज फी-
उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क रुपये भरावे लागेल. तर SC, ST, EWS, PWD आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिसूचना
शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी 13 ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
https://www.rrcnr.org/rrcnr_pdf/Act_Apprentice_2024.pdf

अर्ज कसा करायचा?
रेल्वे रिक्रूटमेंट सेल च्या अधिकृत(recruitment agencies) वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्जभरल्यानंतर अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची प्रिंटआउट प्रत देखील घ्या.

हेही वाचा :

थंड पाण्याने अंघोळ केल्याने वजन कमी होईल का? तज्ज्ञांचे मत काय?”

“भारत-श्रीलंका वनडे मालिका: पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर न झाल्याने पहिला सामना राहिला टाय”

‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज