SBI क्लार्क पदासाठी भरती सुरू; संपूर्ण सूचना उपलब्ध

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात (clerk)अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. SBI क्लार्क भरती २०२४ साठी उमेदवारांना १७ डिसेंबरपासून अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर असोसिएट्च्या पदासाठी भरतीला सुरुवात झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ७ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी संपूर्ण भारतभरातून 13735 उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. संपूर्ण भारतभरातून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

मुळात, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SBI च्या bank.sbi या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. फेब्रुवारी २०२५ महिन्यात प्रलिम्स आयोजित केले जाईल तर मेन्स Exam मार्च/ एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात येईल.अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. आरक्षित वर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. एकंदरीत, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.

PwBD तसेच ESM या प्रवर्गातील उमेदवारांनाही (clerk)अर्ज शुल्कात पूर्णतः सूट देण्यात आली आहे. सामान्य क्ष्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहेत , तर OBC आणि EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही सारख्या रक्कमेची भरपाई करावी लागणार आहे.मुळात, अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहे. तर एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये जाहीर असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज करता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

किमान २० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात दूत देण्यात येईल. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना (clerk) वयोमर्यादेत अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येईल. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक ३ वर्षांची सूट देण्यात येईल तर PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० ते १५ वर्षांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.मुळात, लडाखमध्ये या भरती प्रक्रियेसाठी डिसेंबरच्या ७ तारखेपासून अर्ज विंडो सुरु करण्यात आली आहे. येथील उमेदवारांना २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. जानेवारी २०२५ महिन्यात प्रलिम्स आयोजित केले जाईल तर मेन्स Exam फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात येईल.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे