UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज!

चांगल्या पद आणि पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत विविध पदांची भरती(Recruitment)केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आलाय.

यूपीएससी अंतर्गत धोकादायक वस्तू निरीक्षक, इंग्रजी, हिंदी, भूगोल इत्यादी विविध पदांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर यासंदर्भातील जाहिरात तुम्हाला पाहता येईल. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी(Recruitment) ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे.
रिक्त पदांचा तपशील
यूपीएससीने धोकादायक वस्तू निरीक्षक सरकारी नोकरी आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत धोकादायक वस्तू निरीक्षकची 3 पदे,सहाय्यक प्राध्यापक (रसायनशास्त्र) ची 3 पदे,सहाय्यक प्राध्यापक (वाणिज्य) चे 1 पद,
सहाय्यक प्राध्यापक (संगणक विज्ञान) चे 1 पद, सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी) ची 2 पदे,सहाय्यक प्राध्यापक (भूगोल) चे 1 पद, सहाय्यक प्राध्यापक (हिंदी) ची 4 पदे, सहाय्यक प्राध्यापक (इतिहास) चे 2 पदे,सहाय्यक प्राध्यापक (भौतिकशास्त्र) ची 2 पदे,
सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती विज्ञान) चे 1 पद, सहाय्यक प्राध्यापक (राज्यशास्त्र) चे 4 पदे,सहाय्यक प्राध्यापक (प्राणीशास्त्र) ची 2 पदे,
सहाय्यक प्राध्यापक (वाणिज्य) ची 3 पदे,सहाय्यक प्राध्यापक (अर्थशास्त्र) ची 2 पदे, सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी) चे 1 पद, सहाय्यक प्राध्यापक (इतिहास) ची 3 पदे, सहाय्यक प्राध्यापक (शारीरिक शिक्षण) चे 1 पद भरले जाणार आहे. अशी एकूण 34 रिक्त पदे भरली जातील.
पात्रता
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच UGC NET/SLET/SET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 11 जुलै 2009 पूर्वी एम.फिल किंवा पीएच.डी. साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना नेट परीक्षेतून सवलत देण्यात येईल. धोकादायक वस्तू निरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, धोकादायक वस्तू प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार भरतीच्या(Recruitment) अधिकृत नोटिफिकेशनमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील तपशीलवार तपासू शकतात.
वयोमर्यादा
धोकादायक वस्तू निरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहाय्यक प्राध्यापकासाठी कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयोमर्यादा 27 मार्च 2025 च्या आधारावर मोजली जाईल. राखीव प्रवर्गांना उमेदवारांना वयोमर्यादेत नियमांनुसार सवलत दिली जाईल, याची नोंद घ्या.
किती मिळेल पगार?
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल 10 आणि लेव्हल 11 नुसार मासिक पगार दिला जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 25 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. सर्व श्रेणीतील अनुसूचित जाती/जमाती/मानवतांत्रिक/महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्या.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे.
कधीपर्यंत पाठवाल अर्ज?
28 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर अर्जाची लिंक बंद होईल. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावा. अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.
हेही वाचा :
‘टीम DM’ अॅक्टिव्ह? आमदाराच्या निकटवर्तीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
4 महिन्यांच्या संसारानंतर अभिनेत्री अदिती शर्मा घटस्फोट घेणार?
डिजिटल पेमेंट होतील महाग, UPI आणि RuPay व्यवहारांवर लागणार व्यापारी शुल्क!