UPSC CBI असिस्टंट प्रोग्रामरच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. UPSC च्या या भरतीसाठी(Recruitment) अर्जच करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सखोल माहिती अभ्यासता येणार आहे. आजपासून या भरतीसाठी आयोजित अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांना आजपासून या भरतीसाठी(Recruitment) अर्ज करता येणार आहे. एकूण रिक्त २७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजली गेली आहे. CBI विभागातील असिस्टंट प्रोग्रामरच्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्तीस पात्र उमेदवार देशभरातून येणार आहेत. देशभरातून इच्छुक उमेदरांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
८ नोव्हेंबर रोजी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना ९ नोव्हेंबरपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
UPSC च्या upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना लेव्हलच्या ७ च्यानुसार, ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये इतके दरमाह वेतन दिले जाईल. एकंदरीत, हे वेतन उमेदवाराच्या अनुभवावर आधारित आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. काही आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. एकंदरीत, सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. OBC तसेच EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरायचे आहेत.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क निशुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच महिला प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रियेत परीक्षेचा समावेश आहे. परीक्षे संदर्भात तारखा अद्याप जाहीर केल्या गेल्या नाहीत. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. एकूण ४ टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
मुलखातीच्या आधारावर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. पुन्हा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणीसाठी यावे लागेल. वैद्यकीय चाचणीसह नियुक्तीची प्रक्रिया पार पडेल. या भरतीसाठी नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना या सर्व प्रक्रियेमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना नक्की वाचा.
हेही वाचा :
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी?
नेट पॅक नसेल तरी ऑनलाईन पैसे पाठवता येणार!
अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!