रील स्टारचा ३०० फूट खोल दरीत पडून मृत्यू, VIDEO

सध्या सोशल मीडियाची क्रेझ तरुणांमध्ये वाढत आहे. तरुणवर्ग सोशल मीडियावर(deep dive) रील्स बनवून प्रसिद्धी मिळवत आहे. तरुणवर्गापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा हा आवडीचा छंद बनला आहे. बऱ्याच वेळा या स्टंटमुळे अनेक व्यक्तीचे जीवही गेले आहेत, असाच एक प्रकार अलिबागमधून समोर आला आहे. अलिबाग जवळील माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याती घटना घडली आहे.

अन्वी कामदार(deep dive) असं दरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अन्वी तिच्या काही सहकार्यासोबत मुंबईहून माणगावमधील कुंभे येथे पर्यटनासाठी आली होते. मात्र दरीच्या एका कड्यावर रील बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि तब्बल ३०० फूट दरीत कोसळली.

दरम्यान अन्वीच्या सहकार्यानी ही माहिती तात्काळ माणगाव पोलिसांना दिली. सर्व माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरी अतिशय खोल असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र बचाव कार्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी कोलाड तसेच माणगाव शिवाय महाड येथून अधिकचे प्रशिक्षिक बचाव पथकास बोलावले.

सर्वांच्या सहकाऱ्याने अन्वीला जखमी अवस्थेत स्ट्रेचरच्या साहाय्याने वर आणण्यात आले. त्यानंतर अन्वीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

दरीत पडून दुर्देवी मृत्यू झालेली अन्वी मुंबई येथे वास्तव्यास होती. पावसाळ्यात पर्यटनासाठी ती आपल्या सहकार्यांसोबत माणगाव येथील कुंभे धबधब्याजवळ आली होती. मात्र अन्वीही एक लोकप्रिय सोशल मीडिया रिल स्टार होती शिवाय ती व्यावसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याचीही माहीती समोर येत होती.मात्र तरुण वयात दुर्देवी मृत्यू झाल्याने अन्वीच्या कुटुंबियावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

स्मृती मानधनाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? नॅशनल क्रशने सांगितली ‘दिल की बात’

‘माझ्यासोबत विश्वासघात झाला’; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप!

मित्राबरोबर मस्करी करताना तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू