रिलायन्स जिओची सर्वात धमाकेदार ऑफर: 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट त्यासोबत…

रिलायन्स जिओने(jio) आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास ‘झिरो रिस्क ट्रायल’ ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये जिओ फायबर आणि एअरफायबर सेवेचा 50 दिवसांसाठी मोफत वापर करता येईल.

ही ऑफर नवीन आणि विद्यमान अशा दोन्ही ग्राहकांसाठी आहे. म्हणजेच, ज्यांच्याकडे आधीपासून जिओचे कनेक्शन आहे, तेदेखील या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीने या ऑफरची माहिती दिली आहे. एक मेसेज पाठवून ही सेवा सुरू करता येते.
मोफत सेट-टॉप-बॉक्स आणि राऊटर
जिओच्या(jio) या ऑफरची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. यामध्ये 50 दिवसांसाठी मोफत इंटरनेट, टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येईल. जिओ मोफत सेट-टॉप-बॉक्स, राऊटर आणि इंस्टॉलेशनची सुविधा देखील देणार आहे.
ऑफरचा लाभ कसा घ्याल?
नवीन ग्राहकांना प्रथम 1234 रुपये सुरक्षा रक्कम भरावी लागेल, जी नंतर परत मिळेल. त्यानंतर 50 दिवसांची मोफत ट्रायल मिळेल. मोफत वापरानंतर सेवा सुरू ठेवायची असल्यास, 1234 रुपयांचे क्रेडिट मिळेल, जे पुढील 50 दिवसांसाठी वापरता येईल.

उदाहरणार्थ, 50 दिवसांनंतर 599 रुपयांचा प्लॅन घेतल्यास, तुमच्या वॉलेटमध्ये 1234 रुपये शिल्लक असतील. यातून पहिला रिचार्ज होईल आणि उर्वरित रक्कम पुढील रिचार्जसाठी वापरता येईल. जर तुम्हाला सेवा सुरू ठेवायची नसेल, तर शुल्क वजा करून 979 रुपयांचा परतावा मिळेल.
ऑफर ॲक्टिव्हेट करण्यासाठी
विद्यमान वापरकर्त्यांनी ऑफर ॲक्टिव्हेट करण्यासाठी WhatsApp वरून 6000860008 या क्रमांकावर ‘Trial’ असा मेसेज पाठवावा. रिचार्ज केल्यानंतर लगेच लाभ मिळण्यास सुरुवात होईल. या ट्रायल ऑफरमध्ये 800+ टीव्ही चॅनेल्स, 13 ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येईल, ज्यात Disney+ Hotstar, Zee5, SonyLiv, Sun Nxt यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला; रुग्णसंख्या वाढतानाच सांगलीत दोघांचा मृत्यू
‘मुलांचे फोटो काढू नका…’, सैफच्या हल्ल्यानंतर करीना Alert Mode वर; पापाराझींना दिला इशारा
कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोम आजाराचा दुसरा बळी; सीपीआरमध्ये पाच जणांवर उपचार सुरु