महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

या आठवड्यात मौल्यवान धातू सोन्याच्या(gold) किमतीमध्ये चढ-उतार दिसून आली. लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीतील घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली. तर, बुधवारनंतर दरवाढीने सुर आवळला.

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात(gold) 230 रुपयांची घसरण झाली. सोमवारी 110 तर मंगळवारी त्यात 120 रुपयांची घसरण झाली होती. 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी पुन्हा त्यात घसरण झाली. तर काल 29 नोव्हेंबर रोजी सोन्याने 760 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,760 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, गेल्या चार दिवसांपासून चांदीला आघाडी घेता आल नाही. गेल्या आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी वधारली. सोमवार आणि मंगळवारी त्यात एकूण 2500 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर दोन दिवसात किंमतीत बदल दिसला नाही. 29 नोव्हेंबर रोजी 2 हजारांनी किंमती उतरल्या. मात्र, आज सकाळच्या सत्रात चांदीत महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,740, 23 कॅरेट 76,433, 22 कॅरेट सोने 70,294 रुपयांवर आहे. तर18 कॅरेट आता 57,555 रुपये, 14 कॅरेट सोने 44,893 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.

हेही वाचा :

आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, ‘या’ साबणांच्या किमती वाढणार

1500 रुपये ‘लाडक्या बहिणी’ला अन् अख्खी तिजोरी भावाला; सुषमा अंधारे

“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी