सर्वसामान्यांना दिलासा! सोन्याचे दर घसरले

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. सणासुदीच्या दिवसात अनेकजण (Relief)सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. तसेच लगीनसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळेही दागिने खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. काल दिवसभरात सोन्याच्या भागात तब्बल १००० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आज सोन्याच्या किंमतीत फक्त १०० रुपयांनी घट झाली आहे.

सोने-चांदीचे भाव वाढत आहेत. सोने लवकरच १ लाख पार जाईल, अशी शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. सोने सध्या ८९ हजार रुपयांना विकले जात आहे. रोज या किंमतीत वाढ होत आहे. (Relief)त्यामुळे खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोने हे ८९५६७ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१,७३६ रुपये आहे. या किंमतीत ८८ रुपयांनी घट झाली आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ८९६७० रुपये आहे. या किंमतीत ११० रुपयांनी घट झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत
आज १ ग्रॅम सोने ८,२२० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६५,७६० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ८२,२०० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत फक्त १०० रुपयांनी (Relief)घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम सोने ६,७२६ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,८०८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ६७,२६० रुपये आहे.

चांदीची किंमत
आज ८ ग्रॅम चांदीची किंमत ८२४ रुपये आहे. १० ग्रॅम चांदी १,०३० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,३०० रुपये आहे.

हेही वाचा :

हेच बघणं बाकी होत! महिलेने चक्क म्हशीचे केले आयब्रो video viral

भरधाव वेगातील कारचा थरार! मद्यधुंद चालकानं महिलांना उडवलं

‘टोल टोल टनटनाटन…’, सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?