प्रजासत्ताक दिन परेडचे टिकिट बुकिंग सुरू – तुमची सीट 20 रुपयांत घरबसल्या बुक करा!
भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)26 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षीच्या ऐतिहासिक सोहळ्याची रंगतदार मालिका आणि प्रतिष्ठित परेड नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
तिकीट दर व कार्यक्रम:
प्रजासत्ताक दिन परेड(Republic Day): 100 रुपये आणि 20 रुपये
बीटिंग रिट्रीट रिहर्सल: 20 रुपये
बीटिंग रिट्रीट सोहळा: 100 रुपये
तिकीट बुकिंगची अंतिम मुदत: ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारी 2025 ते 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे. इच्छुक नागरिकांना त्यांचे स्थान आरक्षित करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
तिकीट बुकिंगची प्रक्रिया:
ऑनलाईन बुकिंग:
अधिकृत वेबसाईट: www.aamantran.mod.gov.in
इच्छित कार्यक्रम निवडा आणि माहिती भरा.
ऑनलाइन पेमेंट करा.
मोबाइल अॅपद्वारे बुकिंग:
‘Aamantran’ अॅप डाउनलोड करा (Google Play Store किंवा Apple App Store वरून).
हवे असलेले कार्यक्रम निवडा व ऑनलाइन पेमेंट करा.
ऑफलाईन बुकिंग:
दिल्लीतील विविध ठिकाणी तिकीट खिडक्या व बूथ उभारण्यात आले आहेत. तेथे जाऊन मूळ ओळखपत्र दाखवून तिकीटे खरेदी करता येतील.
संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण: भारताच्या संविधानाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना, या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी नागरिकांना तिकीट बुकिंगचा उत्तम संधी आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : मोठ्या बहिणीवर प्रेम, आईवर राग: रागाच्या भरात मुलीने आईलाच संपवले;
“‘देख रहा है बिनोद?’: भाजप-आपने शेअर केले पंचायतचे डीपफेक Video
बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पराज’ची दमदार कामगिरी, ‘मुफासा’ची सुरु गर्जना तर ‘बेबी जॉन’ फ्लॉप!