शेजारच्या पती-पत्नीमधील वाद सोडवणं बेतलं जीवावर; चाकूने वार करून एकाचा गळाच कापला
नागपूर : शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याचा वाद सोडविण्यासाठी जाणे एकाच्या जीवावर(business) बेतले. शेजाऱ्याने चाकूने गळा कापून त्याचा खून केला. ही थरार घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत येरखेडा परिसरात घडली. पंकज नत्थुलाल सोळंकी (वय 38) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी शेजारी महेश जीवनलाल उके (वय 32) यास अटक केली आहे.
आरोपी महेश हा भंगारचा व्यवसाय(business) करतो. गणेश लेआऊट परिसरातील एका इमारतीत पहिल्या माळ्यावर पत्नी व 3 मुलांसोबत राहतो. मृतक पंकज हा काच कटिंगचे काम करायचा आणि महेश राहत असलेल्या इमारतीमध्येच पहिल्या माळ्यावर आईसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महेशचे त्याच्या पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. महेशने पत्नीला मारहाण सुरू केली. पत्नीने मदतीसाठी भावाला बोलावले. साळा घरी येताच महेशने त्याच्याशीही वाद घातला.
शिवीगाळ करून मारहाण करू लागला. साळ्याने त्याला विरोध केला. तो आणखी जास्त चिडला. त्याने साळ्याला मारण्यासाठी स्वयंपाकखोलीतून चाकू आणला. तो साळ्यावर वार करण्याचा प्रयत्न करू लागला. पत्नीने भावाच्या मदतीसाठी आरडा-ओरड सुरू केली. पंकज मदतीला धावला. त्याने महेशला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र महेश काही ऐकायला तयारच नव्हता. याच दरम्यान महेशने पंकजच्या गळ्यावर चाकूने वार केला. रक्ताची धार लागली आणि पंकज रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला.
हेही वाचा :
पुढचे 244 दिवस ‘या’ 3 राशी राहतील धनवान
पुन्हा कोयता गँगची दहशत; दुकानासह वाहनांची तोडफोड, धक्कादायक VIDEO
‘एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे,’ संजय राऊतांचा गौप्यस्फोट!