राज्यात पावसाची विश्रांती; आता थेट ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाचा जोर
राज्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मराठवाड्यासह अनेक भागात(rain) सध्या उन्हाचे चटके लागत आहेत. दोन आठवड्यापुर्वी जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस येऊन गेला. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात(rain) सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाला आहे. सध्या पाऊस थांबला आहे. आता पाऊस थेट 16 ऑगस्टनंतर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. काही दिवसांपुर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस पडत नसल्याची स्थिती आहे.
मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असते, मात्र पाऊस पडत नाही असं चित्र दिसून येतंय. दुसरीकडे पुणे, मुंबई, रायगड , कोल्हापूर येथे चांगलाच पाऊस पडून गेलाय. पावसामुळे पुण्यातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची तीव्रता कमी असल्याने आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस होईल.
हेही वाचा :
स्वातंत्र्याची 78 वर्षे; भारताने काय कमावलं अन काय गमावलं?
गणेशभक्तांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफीचा निर्णय