सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून(text) फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. निवृत्त बँक कर्मचाऱ्यास आपल्या बँक खात्यावरील व्यवहार होणार नाहीत, अशी भीती घालून ऑनलाइन ‘केवायसी’ पूर्ण करण्याचा बहाणा करीत खाते ‘हॅक’ करून २१ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप मारुतीराव शिंदे रा. प्रथमेश बंगला, घनशामनगर, सांगली यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी शिंदे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एसएमएस आला. तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज ‘सस्पेंड’ होईल. तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क सांगा, असे सांगितले. शिंदे यांनी थोड्या(text) वेळाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा समोरून बोलणार्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता, हेड ऑफिस, बँक ऑफ इंडिया, मुंबई येथून बोलतो.
तुमचे अकाऊंट सस्पेंड झाले असून, ते अॅक्टिव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला. एक व्हॉट्सअॅप क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाईल सुरूच ठेवला. शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आधार कार्ड क्रमांक, खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला.
राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ (text) नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाइन करत आहे, असे सांगून मोबाईल चालू ठेवा, अशा सूचना केल्या. १५ ते २० मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले. परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने ‘हॅक’ केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील २१ लाख ७५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला. त्यांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :
ICC ची मोठी घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला मिळणार कोटींचे बक्षीस उपविजेत्यांसाठीही मोठी रक्कम
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!
हंपबॅक व्हेलने जिवंत माणसाला गिळले पण पुढच्याच क्षणी जे घडलं… Video Viral