डीपफेक टेक्निकचा धोका वाढला, इंटरनेट विश्वात वावरताना महिलांनी राहावे सावध

सायबर चोरटे महिलांना नवनव्या पद्धतीने लक्ष्य(deep fake video) करत असून राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शहरात सायबर क्राईमचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये २१ प्रकरणे महिला अत्याचाराची आहेत. त्यामुळे इंटरनेट जगतात महिलांनी सजग राहाण्याची गरज आहे.

एआयचा उपयोग करून एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवर कोणाचाही चेहरा मॉर्फ(deep fake video) करता येतो. याच डीपफेक टेक्निकचा उपयोग करून पोर्न साईटवर मॉर्फ केलेले फोटो किंवा व्हिडीओ टाकण्याची प्रकरणे समोर आली आहेत.

कधी बनावट पोलिस बनून महिलांना व्हिडिओ कॉल करीत कागदपत्रे बेकायदेशीरपणे वापरल्याचे सांगितले जाते. व्हॅरिफिकेशन पूर्ण होतपर्यंत त्यांना खोलीत नजरकैद केले जाते. व्हेरिफिकेशनसाठी पैसे उकळले जाते. यूपी व हरयाणामध्ये महिलांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ सायबर अरेस्ट राहावे लागले.

काही घटनांमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे नंबर वापरून ऑनलाईन पद्धतीने एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. यासाठी त्या व्यक्तीचा रजिस्टर इमेल आयडी किंवा फिंगर प्रिन्ट वापर केला जातो.

ऑनलाईन इंटरनेट विश्वात ८० टक्के महिलांवर सायबर हल्ले होतात. त्यासाठी सोशल मीडिया व ईमेलवर टू-वे ऑथेंटिफिकेशन सेटिंग ऑन ठेवावी. मोबाईलमध्ये अॅन्टिव्हायरस इन्स्टॉल ठेवावा. परिचितांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारावी.

इंटरनेटवर सुरक्षेसाठी ‘हे’ करावे

  • शक्यतो मोबाईलचा जीपीएस बंद ठेवावा.
  • सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यता तपासा.
  • प्रोफाईल लॉक व गोपनीयता सेटिंग ऑन ठेवा.
  • सोशल मीडियावर स्वतःचे फोटो, पोस्ट किंवा शेअर करणे टाळा.
  • एखादा संशयित वाटल्यास त्याला त्वरित ब्लॉक करा.
  • आपली वैयक्तिक माहिती सामायिक करू नका.
  • सायबर क्राईमचे बळी पडल्यास त्वरित तक्रार करा.

हेही वाचा :

मी त्यांचं कौतुक करतो.. राज ठाकरेंच्या ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान!

‘पुष्पा द रूल’मधील ६ मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले ६० कोटी, शूटिंगसाठी लागला १ महिना

‘तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल…’ विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?