रितेश-जिनिलियाने घेतला आयुष्यातील मोठा निर्णय
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी अवयवदान (decision)करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी ही माहिती दिली. या व्हिडिओतून त्यांनी अवयवदानाला ‘आयुष्यातील सर्वात सुंदर भेट’ म्हटले असून, चाहत्यांनाही अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
रितेश आणि जिनिलिया हे गेल्या बऱ्याच काळापासून अवयवदानाचा(decision) विचार करत होते. आता नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनने (NOTTO) व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे NOTTO ने रितेश आणि जिनिलियाचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया हे या गोष्टीला अत्यंत सुंदर भेट असल्याचं सांगत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी चाहत्यांनाही अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे.
या व्हिडीओमध्ये रितेश म्हणाला, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही दोघांनी अवयवदान केलं आहे.” तर जिनिलिया सांगते, “होय, आम्ही आमचं अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे आणि ही आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर भेट आहे. यापेक्षा चांगली भेट अजून काही असूच शकत नाही.” रितेश आणि जिनिलियाप्रमाणेच याआधी इतर सेलिब्रिटींनीही अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीने 2022 मध्ये हा निर्णय घेतला होता. जुईने हृदय, आतडे, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि डोळे दान करण्याचं वचन दिलं आहे. त्यापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही नेत्रदान केल्याची माहिती दिली होती. रितेश आणि जिनिलियाच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून अवयवदानाबद्दल जागरुकता निर्माण केली होती. अवयवदानामुळे मृत्यूनंतर तुम्ही आठ-नऊ लोकांचे प्राण वाचवू शकता. तुम्ही तुमचं हृदय, यकृत, फुफ्फुसं हे अवयव दान करू शकता.
हेही वाचा :
क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी…
विशाल पाटलांना मंत्र्यानं दिली थेट भाजपात येण्याची ऑफर, अन् मग…
ऑलिम्पिकसाठी सिंधू ध्वजवाहक ;नेमबाज गगन नारंगची पथकप्रमुख निवड