रिया सेनच्या वडिलांचे निधन, वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री रायमा सेन आणि रिया सेन यांचे वडिल आणि बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती भारत देव वर्मा यांचे निधन झाले आहे. मुनमुन सेन यांच्या पतीने आज (१९ नोव्हेंबर) कोलकात्यातील राहत्या घरी सकाळी ९ वाजता अखेरचा श्वास घेतला ते ८३ वर्षाचे होते.

भारत देव यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोलकात्यातील ढाकुरियातल्या खासगी रुग्णालयातील ॲम्ब्युलन्स बोलावली होती. मात्र ॲम्ब्युलन्स निवासस्थानी पोहोचण्याआधीच भारत देव यांनी आपले प्राण सोडले.

दक्षिण कोलकात्यातील एका खाजगी रुग्णालयातून त्यांच्या कुटुंबीयांनी हॅरिंग्टन स्ट्रीट येथील निवासस्थानी ॲम्ब्युलन्स मागवली होती. त्या ठिकाणी अभिनेते भरत देव वर्मा आपल्या कुटुंबासोबत राहत होते. भरत देव वर्मा यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचे तर, भरत यांनी ‘मेमरीज इन मार्च’ चित्रपटामध्ये(Bollywood) दिवंगत रितुपर्णो घोष आणि दीप्ती नवल यांच्यासोबत काम केले होते. भरत देव वर्मा यांना या चित्रपटातून ‘हबी’ नावाने चाहते ओळखायचे.

भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. भरत यांची आई इला देवी कूच बेहारची राजकुमारी आणि जयपूरची राणी गायत्री देवी यांची मोठी बहीण होती. भारत यांची आजी इंदिरा या वडोदराचे महाराज सर्जीराव गायकवाड तिसरे यांच्या एकुलत्या कन्या होत्या. भारत यांनी अभिनेत्री मुनमुन सेन यांच्याशी लग्न केलं. त्यांना रायमा आणि रिया या दोघी मुलगी असून दोघीही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.

भारत देव वर्मा यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला. एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “मुनमुन सेन यांचे पती आणि माझे हितचिंतक भारत देव वर्मा यांच्या निधनाने मी दु:खी आहे. ते अत्यंत प्रेमळ होते. मी त्यांच्या आठवणी कायम माझ्या मनात जपून ठेवीन. त्यांनी खरोखरच मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानलं होतं. त्यांच्या निधनाने मी खूप काही गमावलंय.

आज सकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच मी त्यांच्या बालीगंगे इथल्या निवासस्थानी गेले. तिथे त्यांची मुलगी रिया उपस्थित होती. तर पत्नी मुनमुन आणि दुसरी मुलगी रायमा दिल्लीहून येत आहेत. त्यांनी मी श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करते.”

मुनमुन सेन यांनी लग्न आणि आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. १९८४ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंदर बाहर’चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये(Bollywood) डेब्यू केले. भरत यांनी भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारत भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये, करिअरमध्ये 60 हून अधिक चित्रपट आणि 40 हून अधिक टेलिव्हिजन शोजमध्ये काम केलंय.

भारत देव आणि मुनमुन यांची मुलगी रिया सेनने हिंदी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘विशकन्या’मध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. तर ‘स्टाइल’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. रियाने ‘झंकार बीट्स’, ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन, म्हणाले…

लॉरेन्स बिश्नोईचा जीव धोक्यात? ‘तुरुंगातून बाहेर येताच मारणार…’, कुख्यात गँगस्टरला जीवे मारण्याची धमकी?