सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा

2007चा T20 विश्वचषक जिंकण्यात मोठा वाटा असलेला खेळाडू म्हणजे रॉबिन(retirement) उथप्पा. रॉबिन उथप्पाची वेगवान खेळी आणि पाकिस्तानविरुद्धचा बॉल आऊट सामना जिंकण्यात क्वचितच कोणीही विसरू शकेल.  पण अलीकडेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने  युवराज सिंगच्या निवृत्तीचे कारण सांगितले.यासोबतच त्याने क्रिकेट खेळात क्रिकेटपटूंना कोणत्या मानसिक स्थितीचा सामना करावा लागतो यावरही भर दिला. रॉबिन उथप्पाने असा दावा केला आहे की, संपूर्ण जगात कोणत्याही खेळात सर्वाधिक आत्महत्या होत असतील तर ते क्रिकेट आहे.

तर त्याने असेही वक्तव्य केले आहे की, क्रिकेटरवर इतका दबाव असतो की त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि तो डिप्रेशनमध्ये जातो.  रॉबिनने नुकतेच लल्लन टॉपला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींवर भर दिला. त्याने सांगितले की, ” क्रिकेट या खेळात केवळ खेळाडूंनाच नाही तर पंच आणि प्रसारकांनाही मानसिक ताण आणि दबावाचा सामना करावा (retirement)लागतो. क्रिकेट हा सांघिक खेळ असूनही, त्यात अनेक वैयक्तिक संघर्षांचाही समावेश असतो, जिथे खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

खूप कमी लोकांना माहित आहे की सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात.” पुढे तो म्हणाला की, ” या खेळातील स्पर्धेची पातळी एवढी जास्त आहे की, बेंचवर बसलेल्या इतर खेळाडूंच्या तुलनेत खेळाडूंना नेहमीच त्यांच्या जागेची चिंता असते. 10-15 वर्षे या तणावात आणि भीतीत खेळून, (retirement)व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जाते आणि अंधारात जाते, ज्यामुळे शेवटी मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.” 

2011 मधील आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “मला 2011 मध्ये  स्वतःची लाज वाटत होती.  एक व्यक्ती म्हणून मी काय झालो याची मला लाज वाटू लागली होती.” त्यावेळी तो नैराश्याशी झुंजत होता आणि आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचला होता. या कठीण काळात, त्यांना असे वाटले की तो त्यांच्या प्रियजनांवर ओझे बनला आहे आणि स्वतःचा काहीच उपयोग होत नाहीये. 

हेही वाचा :

‘मी फक्त हिंदू मतावरच निवडून आलो,’ नितेश राणेंचे मोठे विधान!

विराट-अनुष्काचा प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत, अनुष्काने विचारलेले सवाल आणि महाराजांचे उत्तर

‘आय लव्ह यू’ असा मेल केला, रिप्लाय न मिळाल्यावर शिवाली परबनं सांगितले जबरी चाहत्यांचे किस्से

VIDEO: केन विल्यमसनचा षटकार दर्शकाचा झेल आणि 90 लाखांची लॉटरी