रोहित शर्मा होपलेस.., हिटमॅन आऊट ऑफ फॉर्म; 88 वर्षांच्या आजीबाई भडकल्या-VIDEO

भारतीय संघाला(team india) मायदेशात न्यूझींडविरुद्ध खेळताना व्हॉईटवॉशचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही. भारताने सलग दोनदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र पहिल्यांदाच भारतीय संघ(team india) फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंना जोरदार टिकेला सामोरं जावं लागलं. दरम्यान एका ८८ वर्षांच्या आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शशांक जेकब या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ८८ वर्षांच्या आजीबाई रोहित शर्मावर टीका करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये असलेल्या आजीबाई भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणतात, ‘ रोहित शर्मा होपलेस आहे. त्याने जी काही कामगिरी केली आहे, ती निराशानजनक आहे.’ आजीबाईंच्या मते, भारतीय संघ मजबूत संघ आहे. मात्र अशा मजबूत संघाकडून अशी कामगिरी, हे खूप निराशाजनक आहे.

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. आजीबाई या व्हिडिओमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल स्पष्टपणे बोलल्या आहेत. काही युजर्सला आजीबाईंचा स्पष्ट वक्तेपणा आवडला आहे. तर काहींनी टीका देखील केली आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मालिका १-१ ने बरोबरीत आणल्यानंतर, मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत राहिला होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारताने ही मालिका ३-१ ने गमावली.

हेही वाचा :

सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!

1 चेंडूवर 286 धावा…! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड

चालू ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी, झिंज्या उपटल्या, साड्या फाडल्या पण थांबलं नाही भांडण; Video Viral