‘रोहित निगेटीव्ह कर्णधार असून…’, Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मावर(Rohit sharma) कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमधील पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान गावसकरांनी रोहितवर निशाणा साधला.

फिरकी गोलंदाजांसाठी लाँग ऑन आणि लाँग ऑफला फिल्डर्स ठेवण्याच्या रोहितच्या(Rohit sharma) निर्णयावर गावसकर संतापले. पहिल्या सत्राच्या खेळात घडलेला हा प्रकार पाहून गावसकरांनी रोहित फारच बचावात्मक पवित्रा स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे.

सामन्यातील 19 व्या षटकामध्ये रोहितने लावलेली फिल्डींग पाहून गावसकर संतापले. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर लावलेली फिल्डींग पाहून कॉमेंट्री करणाऱ्या गावस्करांनी लाइव्ह सामन्यादरम्यानच नाराजी व्यक्त केली. “तुम्ही अशी फिल्डीगं लावली ज्यात फलंदाज उडता फटका मारण्याआधीच तुम्ही फिरकी गोलंदाजांसाठी लाँग ऑन आणि लाँग ऑफला खेळाडू उभे केलेत तर अशा कर्णधाराला बचावात्मक कर्णधारच म्हणावं लागेल.

तो नकारात्मक कर्णधार असून फारच बचावात्मक पद्धतीने खेळणार कर्णधार आहे. इथे आता तुम्ही चौकार आणि षटकार वाचवण्याचा प्रयत्न करताय,” असं म्हणत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. “(फिल्डींग बदलल्यानंतर) याला उत्तम रचना म्हणता येईल. कारण फिरणाऱ्या चेंडूंचा विचार करुन लाँग ऑनला खेळाडू उबा केला आहे. मिड ऑफ आतल्या बाजूला आहे आणि फिरता चेंडू पाहता अशीच फिल्डींग हवी,” असं गावसकर म्हणाले.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्या डावामध्ये फारच बचावात्मक पवित्रा स्वीकारल्याचं म्हटलं. “पहिल्या सत्रात फारच बचावात्मक खेळ केला. त्यावेळेस चेंडू पकड घेत असताना असा खेळ केला गेला. तुम्ही लाँग ऑन आणि लाँग ऑफ ठेवता जेव्हा तुम्ही न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या हातून स्वत:ला खेळवून घेत असल्यासारखं आहे,” असं रवी शास्त्री 48 व्या ओव्हरला काँमेंट्री करताना म्हणाले.

हेही वाचा :

दिवाळीत लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबररोजी?

मलायका अरोराच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट

विधानसभेआधी राजकीय घडामोडींना वेग; ‘या’ माजी मंत्र्यांचा शरद पवार गटात केला प्रवेश