रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!

काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि त्याची पत्नी रितीका सजदेह या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. मात्र आता रितीका सजदेहने मुलाचं नाव जाहीर केलं आहे. रोहित शर्माची पत्नी रितीकाने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितानुसार, रितीका रोहित शर्माने(Rohit Sharma) 15 नोव्हेंबरला दुसऱ्या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अशातच आता रोहित शर्माने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळ कुटुंबियांसोबत घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचं बीसीसीआयला सांगितलं आहे.

मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या नेतृत्वात भारताला विजयी सुरुवात करून देखील दिली आहे. रोहित शर्मा या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आणि टीम इंडियासह जोडला गेला होता. मात्र तेव्हापासून क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्माच्या मुलाचं नाव कधी जाहीर होणार? याची उत्सूकता लागली होती. मात्र आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.

रितीकाने सोशल मीडियावर छोट्या रोहितच्या नावाची नावाची घोषणा केली आहे. रोहित आणि रितीका या दोघांनी त्यांच्या मुलाचं नाव 3 अक्षरी ठेवलं आहे. या जोडप्याने मुलाचं नाव अहान असं ठेवलं आहे. यासंदर्भात रितीकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटोद्वारे आपल्या मुलाचं आणि समायराच्या छोट्या भावाचं नाव जगजाहीर केलं आहे.

हेही वाचा :

सोशल मीडियावर व्हायरल होतोय EVM हॅकिंगचा व्हिडीओ

महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य