1500 रुपये ‘लाडक्या बहिणी’ला अन् अख्खी तिजोरी भावाला; सुषमा अंधारे
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा(political news) निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल देखील जाहीर झालाय. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलाय. परंतु अजून देखील महायुतीने मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न सर्वांसमोर आहे. काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं समोर आलंय. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(political news) यांची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सुषमा अंधारे यांनी X पोस्टमध्ये म्हटलंय की, विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या एका वाचाळ प्रवक्त्याने विजयाच्या पूर्व संधेला असं म्हटलं होतं, की जर 48 तासांमध्ये महाविकास आघाडीने आपलं सरकार स्थापन केलं नाही तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्या शिंदे गटातला सत्तेचा दावा तर संपला. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री मात्र अजूनही ठरत नाही.
आज असं कळतंय की, शपथविधी हा 5 डिसेंबरला होईल. त्यामुळे या ठिकाणी दोन प्रश्न निर्माण होतात. एक भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड गवगवा करत आहे. त्या लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा मिळणार आहे की नाही? लाडक्या बहिणी पंधराशेमध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात, असं किती दिवस चालणार आहे? भारतीय जनता पक्षात एकही महिला मुख्यमंत्रिपदाच्या योग्य नाही का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.
दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जर पाच डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल, तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा देवून टाकलेला आहे. मग हे राज्य पाच तारखेपर्यंत कोणाच्या भरवशावर चालणार आहे. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महायुतीवर हल्लाबोल केलाय. तसेच भाजपमधील एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
इतका लांब ऊस पाहिला आहे का? कोल्हापूरच्या ऊसाची राज्यभरात चर्चा
भाजपचे पुन्हा धक्कातंत्र! पुण्याचे ‘अण्णा’ महाराष्ट्राचे बॉस होणार?
उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर शिंदेंसमोर दिल्लीत भाजपाने ठेवल्या 2 मोठ्या ऑफर्स