मुख्याध्यापक आणि शिक्षकामध्ये राडा, १८ सेकंदात मारल्या २५ थोबाडीत, Video

शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात भांडणं करू नका, दोघांमध्ये मतभेद असतील तर ते चर्चा करून सोडवा. अर्थात ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबाबत समस्या असेल तर शांतपणे बसून त्याच्यासोबत चर्चा करा. तुमचे गैरसमज दूर होतील. पण मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणारे शिक्षकच(teacher)हाणामारी करू लागले तर काय म्हणायचं?

होय, असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक एका शिक्षकाची(teacher) यथेच्च धुलाई करताना दिसत आहेत. या मुख्याध्यापकानं १८ सेकंदात जवळपास २५ थोबाडीत लगावल्या. पण शिक्षक देखील तयारीचा मल्ल निघाला. त्यानं सुद्धा मुख्याध्यापकांना कसं उत्तर दिलं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

ही घटना गुजरातमधील भरूच या ठिकाणी घडली आहे. नवयुग शाळेतील दोन शिक्षक आपापसातच भिडले. मीडिया रिपोर्टनुसार मुख्याध्यापक हितेंद्र ठाकोर यांना शिक्षक राजेंद्र परमेर याची शिकवण्याची पद्धत आवडत नव्हती. राजेंद्र हे विज्ञान आणि गणिताचे शिक्षक आहेत. शिकवण्याच्या पद्धतीवर सवाल केल्यामुळे शिक्षकाचा इगो हर्ट झाला परिणामी मुख्याध्यापकांसोबत त्याचा जोरदार वाद झाला. आणि पुढे पाहता पाहता या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

दोघांनीही एकमेकांवर हात उचलला. दरम्यान मुख्याध्यापक शिक्षकावर भारी पडले अन् त्यांनी केवळ १८ सेकंदात २५ थोबाडीत लगावल्या. त्यानंतर शिक्षकानं पाय ओढून मुख्याध्यापकांना खाली पाडलं आणि प्रतिहल्ला करण्यास सुरूवात केली. खरं तर ही लढाई आणखी घनघोर झाली असती पण तेवढ्यात इतर शिक्षक मध्ये पडले आणि त्यांनी दोघांना दूर नेऊन हाणामारी रोखली.

ही संपूर्ण हाणामारी मुख्यध्यापकांच्या ऑफिसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या दोन्ही शिक्षकांची बदली करावी अशी मागणी केली जात आहे.

शिक्षकच असे वागत असतील तर मुलांवर काय संस्कार होणार? असा सवाल हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील नेटकरी करत आहेत. असो, या प्रकरणी तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद करण्याचा विचार; महायुतीमध्ये काय घडतंय?

भर कॉन्सर्टमध्येच सोनू निगम चाहत्यांवर भडकला; Video Viral

Video : लग्नाचा आनंद दु:खात बदलला; डान्स करताना तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू!