‘कॉमन मॅन’साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट

स्पष्टोक्ता, सडेतोड, खटक्यावर बोट ठेवून समस्यांवर तोडगा(rule book) काढणारे, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि नियमबाह्य काम न करणारे अशी प्रतिमा असणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याने आज चक्क वाहतुकीचे नियम तोडले.

हा ताफा थेट उलट्या दिशेने गेल्याने इतर वाहनचालकांची(rule book) चांगलीच तारांबळ उडाली. या वेळी त्यांचा चालकही फोनवर बोलतही असल्याचे दिसते. या उलट्या जाणाऱ्या ताफ्याला पोलिसांनीच रस्ता मोकळा करून दिल्या सामान्य लोकांत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार गुरुवारी (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. या वेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर पडले.

तेथून निघताना त्यांचा वाहनांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. आश्चर्य म्हणजे तेथे वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना टोकलेसुद्धा नाही. उलट त्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी मदत केली. याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा :

27 वर्षांनंतर करिष्मा-माधुरीमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी

कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत आल्यास दरवाजे उघडे असतील का?