निर्दयी मामा! २ वर्षाच्या भाचीला विहिरीत फेकलं….

मामा भाची/भाच्याचं नातं हे मैत्रीपूर्ण आणि निखळ असतं. मात्र, याच नात्याला (uncle)काळीमा फासणारी घटना केरळमध्ये घडली आहे. एका मामानं आपल्याच २ वर्षांच्या निष्पाप भाचीला घराच्या बाहेर असलेल्या विहिरीत फेकून दिलं आहे. यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत आरोपी मामानं त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपी मामाला अटक करण्यात आली असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

केरळमधील बलरामपूरम भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्याच मामानं २ वर्षांच्या चिमुकली भाचीला विहिरीत ढकलून दिलं आहे. ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घरातून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर(uncle) पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

शोध घेत असताना पोलिसांना घराबाहेर असलेल्या विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि घरातील सर्व सदस्यांची चौकशी केली. तपासादरम्यान मुलीच्या मामावर पोलिसांचा संशय बळावला असता, त्याची कसून चौकशी करण्यात आली. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार आहे. बलरामपुरम पोलिसांच्या(uncle) एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अतिरिक्त कलमे लावण्यात येतील. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

या क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता कर्जही मिळणार

डॉक्टर नवऱ्यानेच रचला बायकोच्या हत्येचा कट, मेहुणीसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे…

महिला उद्योजाकांना सरकारची साथ ! मिळणार तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज, अर्थमंत्र्यांची घोषणा