सहलीचा आनंद जीवावर बेतला; बसच्या जोरदार धडकेत तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावले निर्सगरम्य धबधबे कोसळणाऱ्या माळशेज(couple) घाटात वळतात. अश्यातच माळशेज घाटात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी सांताक्रूझ – वाकोला भागात राहणाऱ्या तरुण-तरुणीच्या जीवावर बेतलं आहे.
सहलीचा आनंद घेऊन घरच्या दिशेने दुचाकी वरून घरी (couple)निघालेल्या त्या तरुण तरुणीचा भरधाव एस. टी. बसची जोरदार धडक होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रोहित रमेश डिंगणकर (वय २४ वर्षे) व नंदिनी मयांगडे (वय २३ वर्षे) असे दोघा मृतकांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रोहित रमेश डिंगणकर व नंदिनी मयांगडे दोघेही मुंबईतील सांताक्रूझ – वाकोला भागात राहत होते. ते दोघेही गुरुवारी (२० जून रोजी) माळशेज घाटात दुचाकी वरून पावसाळी सहलीसाठी आले होते.
दुपारपर्यत सहलीचा आनंद घेतल्यावर दोघेही त्याच दुचाकीवरून घराच्या दिशेने परतीच्या प्रवासा दरम्यान दुपारच्या सुमारास माळशेज घाटातील वळणदार मार्ग असलेल्या नाणेघाट जवळ राष्ट्रीय महामार्गवर अहमदनगर मार्गे जाणाऱ्या तारकपूर आगाराच्या बसला धडक होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार तरुण व मागे बसलेल्या तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह मुरबाड शहरातील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले होते.
गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत तरुण तरुणी दोघेही दुचाकीने माळशेज घाटात सहलीसाठी आले होते. त्यानंतर दुपारी घरी जाताना नाणेघाट जवळ एस.टी. बस आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी बस चालक संजय पवार व वाहक उषा मुंडलिक यांना चौकशी कामी टोकावडे पोलिस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास टोकावडे पोलिस करीत असल्याचे सांगितले.
दुसरीकडे गेल्याच आठवड्यात माळशेज घाटातील दरड कोसळून एका प्रवाशी रिक्षावर पडल्याने रिक्षामधील ५ प्रवाश्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पावसाळ्यात मुरबाड – माळशेज महामार्गावर अनेक अपघातांच्या घटना घडत असल्याने पावसाळ्यात कल्याण – नगर राष्ट्रीय महामार्ग प्रवासासाठी सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.
याच माळशेज घाटात काचेचा पूल बनविण्याचा मनसुबा असल्याचे अनेक वर्षांपासून केवळ आणि केवळ ऐकिवातच आहे. परंतु सद्यस्थितीला काचेच्या पुला ऐवजी या महामार्गावर सुरक्षित प्रवासाची हमीच अपेक्षित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
विधासभेसाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; महाराष्ट्र पिंजून काढणार
खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या…
टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार? समोर आली मोठी अपडेट