सैफ अली खान आणि करीना कपूरचा घटस्फोट? ‘बेबो’ने शेअर केलेल्या पोस्टने एकच खळबळ

बॉलिवूडमध्ये अलिकडे सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची(divorce) अनेक प्रकरण समोर आली आहेत. आता बॉलिवूडच्या आणखी एका पावर कपलच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि आणि सैफ अली खान यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. करीना कपूरच्या व्हायरल पोस्टमुळे सैफ आणि करीनाच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. करीनाने शेअर केलेल्या एका क्रिप्टिक पोस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. करीना कपूरने लग्न आणि घटस्फोटासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर आहे. करीनाचा पती अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यापासून करीना मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर पळताना दिसत आहे. त्यातच सैफवरील हल्ल्याच्या अनेक दिवसांनंतर करीनाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे करीना आणि सैफ यांच्या नात्यात दुरावा आल्याचा संशय नेटकऱ्यांना आला आहे. अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्न आणि घटस्फोटासंबंधित(divorce) पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री करीना कपूर-खानने 8 फेब्रुवारी रोजी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. करीनाच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं. या पोस्टमध्ये करीनाने लग्न, घटस्फोट, चिंता आणि मुले या मुद्द्यांना लक्ष केलं आहे. करीना कपूर म्हणाली की, जेव्हा आपल्या प्रियजनांसोबत काही मोठं घडतं तेव्हा ती परिस्थिती आपल्याला विनम्र बनवते. तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “लग्न, घटस्फोट, चिंता, मुलाचा जन्म, प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा पालकत्व यासारख्या गोष्टी आपण स्वतः अनुभवल्याशिवाय पूर्णपणे समजू शकत नाही”.
करीना कपूरने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिलं की, “लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू आणि पालकत्व, या गोष्टी तुमच्यासोबत घडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या कधीच समजणार नाहीत. जीवनात, गृहीतके किंवा सिद्धांत खरे नसतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात, पण जोपर्यंत तुमच्यावर पाळी येते तेव्हा आयुष्य तुम्हाला विनम्र व्हायला शिकवतं.”
दरम्यान, या पोस्टमुळे सैफ-करीनाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे कपलही घटस्फोट घेणार का, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी पडला आहे. मात्र, घटस्फोटाच्या अफवा असून सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे तिच्या आयुष्यात काय बदल झाला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीनाने केला आहे.
हेही वाचा :
20 ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा आता ‘या’ अॅपवर! केवळ 400 रुपयांत 3 महिन्यांचा अॅक्सेस
किळसवाणं कृत्य! तरुणाने टॉयलेटच्या पाण्यात बिस्किट बुडवलं अन्…; Video
किळसवाणं कृत्य! तरुणाने टॉयलेटच्या पाण्यात बिस्किट बुडवलं अन्…; Video