सैफ अली खान प्रकरणात खळबळ: मदतनीस महिला संशयाच्या भोवऱ्यात!
अभिनेता सैफ अली खान दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.(helper) सैफ सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफला शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं आहे. आता या घटनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता एक अज्ञात सैफ अली खानच्या घरात शिरला. घरातील मदतनीसने त्याला अडवलं, त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घातला. आवाज ऐकून सैफ तिथे पोहोचला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला हाताला व मणक्याला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा जास्त खोल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरोडेखोराच्या हल्ल्यात सैफची पत्नी करीना कपूर खान व त्यांची मुलं तैमूर आणि जेह सुरक्षित आहेत; मात्र त्यांची मदतनीस जखमी झाली आहे. या घटनेत सैफ व मदतनीस दोघेही जखमी असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, पण मदतनीसच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती समजू शकलेली नाहीसैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्ल्यापूर्वीच्या दोन तासांमध्ये घराच्या आवारात कोणीही प्रवेश करताना दिसलं नाही.
याचा अर्थ ज्याने सैफवर हल्ला केला तो आधी (helper)इमारतीत घुसला होता. सैफवर हल्ला करून पळून गेलेल्या हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एकूणच घटनाक्रम पाहता सैफच्या घरातील मदतनीस त्या हल्लेखोराला ओळखत असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
सैफ अली खानचा हल्लेखोर हा घरातील मदतीसच्या ओळखीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. मदतनीसनेच त्याला घरात येऊ दिलं असावं, अशी शक्यता आहे. आता पोलिसांना मदतनीसवरही शंका असून ते याचा सखोल तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरातील पाच कर्मचाऱ्यांची मुंबई (helper)पोलिसांकडून अतिरिक्त माहितीसाठी चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला कोणीही सोसायटीत जाताना दिसलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा संशय बळावला आहे.
हेही वाचा :
Kia Seltos चा बेस व्हेरियंट, 2 लाखाचे डाउन पेमेंट आणि फक्त भरा दरमहा ‘एवढा’ EMI
शरद पवारांना मोठा धक्का! बडा नेत्याचा लवकरच अजित पवार गटात प्रवेश
रोजगारात भारताचा डंका, अमेरिकेनंतर दुसरा
शुभ संयोग ‘या’ राशींवर असणार शनिदेवाचा कृपा; मिळणार उत्तम संधी
Chanakya Niti: वाईट काळाची चाहूल देणारे महत्त्वाचे संकेत