समरजीतसिंह घाटगे यांचा निर्णायक निर्णय आज; कागलमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर करणार पुढील भूमिका
कोल्हापूर: भाजपसाठी गेल्या नऊ वर्षांपासून कागल विधानसभा मतदारसंघात (political)महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समरजीतसिंह घाटगे आज कागलमध्ये जाहीर कार्यकर्ता मेळावा आयोजित करत आहेत. या मेळाव्यात त्यांनी त्यांच्या आगामी भूमिकेबद्दल स्पष्टता देण्याची अपेक्षा आहे.
समरजीतसिंह घाटगे यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घ्यायचा प्रयत्न केला होता, परंतु ‘लाडकी बहीण’ योजनेच्या प्रचारामध्ये फडणवीस व्यस्त असल्यामुळे घाटगे यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संवाद साधण्याची सूचना केली गेली होती. भाजपला घाटगे यांचे मन वळवण्यात यश आलेले नाही, असे बोलले जात आहे.
समरजीतसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी या दरम्यान ‘तुतारी हातात घेतील’ अशी चर्चाही सुरू केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर अस्वस्थता व्यक्त करणाऱ्या घाटगे आता निर्णायक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांचा आहे. आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात घाटगे यांची आगामी रणनीती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
ऑलिम्पिक पदकांनी नीरज आणि मनूचा ब्रँड वॅल्यू झपाट्याने वाढला; जाहिरातींसाठी कंपन्यांची रांगेत उभ्या
मराठा आरक्षणावरून पुन्हा वादंग, पृथ्वीराज चव्हाणांची जरांगे यांच्याशी भेटी नंतर सरकारवर टीका
औषधांच्या गोळ्या कडू का लागतात? कारण जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य!