6GB रॅम अन् 6000mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy M35

सॅमसंग ही देशातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. सॅमसंग कंपनी नेहमी नवनवीन स्मार्टफोन लाँच(launched) करत असते. सॅमसंग कंपनी लवकरच आपला Samsung Galaxy M35 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन उत्तम फीचर्ससह लाँच होणार आहे. या स्मार्टफोनचा पहिला लूक समोर आला आहे.

Samsung Galaxy M35 स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असेल. या फोनमध्ये अनेक नवीन अपडेट (launched) देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Google Play च्या सूचीमध्ये दिसला आहे. स्मार्टफोनचा पहिला लूक समोर आला आहे. परंतु अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट दिली जाऊ शकते. स्मार्टफोन 6GB रॅमने सुसज्ज असेल. हा स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात येईल. जी २ दिवसांचा पॉवर बॅकअप देईल. याचसोबत बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेन.

फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल. हा फोन Android 14 OS वर काम करणार आहे. स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह बाजारात उपलब्ध होईल. हा फोन Galaxy A35 ची रिब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे. कॅमेराची मुख्य लेन्स 50MP ची असेल.

हेही वाचा :

‘मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात…’; ‘या’ अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा

होर्डिंग पडून लोकांचा मृत्यू, त्याचठिकाणी रोड शो…अमानुष गोष्ट; राऊतांचा PM मोदींवर हल्लाबोल

अंगावर शहारे आणणार होर्डिंग कोसळण्याचा व्हिडिओ आला समोर