सांगली:”कृष्णा नदीत सेल्फी प्रयत्नात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृत्यू: ४८ तासांनी हाती”
मैत्रिणीसोबत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर सेल्फी(selfie) घेण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेलेल्या तरुणाचे पार्थिव ४८ तासानंतर शिरटी (ता.शिरोळ) येथे मंगळवारी बचाव पथकाला मिळाले. सांगलीवाडीकडील तीरानजीक असलेल्या बंधा-यावर मैत्रिणी समवेत सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. हनुमाननगर) हा तरूण पात्रात पडून वाहून गेला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला होता.
मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात येत होता. मंगळवारी सकाळी शिरटी येथे नदीपात्रात मृतदेह असल्याचे समजल्याने बचाव पथकाने पात्राबाहेर काढला. सदरचे पार्थिव बेपत्ता तरुणाचे असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा :
वरळी हिट अँड रन: ६० तासांचा तपास, १५ मिनिटांत अटक; मिहीर शाहला पोलिसांनी कसा पकडले?
पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी: यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि ताजीतवानी राहील
जॉबसाठी अनोख्या पद्धतीने केलेला अर्ज: कंपनीला बसला धक्का, सोशल मीडियावर व्हायरल