सांगली लोकसभेवरून मविआत तिढा? ठाकरे गट चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार? संजय राऊत म्हणाले…

सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आला आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा (politics) निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर आपला उमेदवारही जाहीर केला. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज दुसरे हे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्याबदल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगली लोकसभेची जागा आपल्याकडे घेतली आहे. परंतु, सांगलीतले स्थानिक काँग्रेस नेते तसेच राज्य पातळीवरील काही नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत.

सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात २७ मार्च रोजी दिल्लीत वरिष्ठ काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत कदम आणि पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली. विशाल पाटील सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांना विश्वजीत कदमांसह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबादेखील आहे.

काँग्रेसने मेरीटवर म्हणजेच गुणवत्तेच्या, गावपातळीवरच्या ताकदीवर उमेदवारी (politics)निश्‍चित करण्याचा आग्रह धरला आहे, धनुष्यातून सुटलेला बाण आणि मातोश्रीवरून दिलेला शब्द मागे घेण्याची परंपरा नसल्याचे सांगत ठाकरे गटानेही सांगलीचा हट्ट कायम ठेवला आहे. यामुळे सांगलीची जागा सेनेकडून सोडवून पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणण्याची लढाई अगोदर नेत्यांना जिंकावी लागणार आहे. तरच भविष्यातील निवडणुका सुलभ आणि सुकर ठरणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांनंतर ठाकरे गट ही जागे सोडेल अशी शक्यतादेखील वर्तवली जात आहे. परंतु, शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, असं काहीच होणार नाही. आमचा उमेदवार सांगलीची जागा लढवेल. शिवसेना (politics) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी आमचा उमेदवार जाहीर केला आहे. तिथे एखादी वेगळी भूमिका घेऊन उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता अजिबात नाही. तुम्ही विचाराल की, यातून काय मार्ग काढणार? त्यावर मी सांगेन, आम्ही यावर आधीच मार्ग काढला आहे. तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला लवकरच कळवू.

संजय राऊत म्हणाले, या जागेबाबत आम्ही दिल्लीत काँग्रेस हायकमांडशीदेखील बोललो आहोत. त्या चर्चेनंतर आम्ही स्पष्ट केलं आहे की उमेदवारी मागे घेतली जाणार नाही. किंबहुना मी स्वतः सांगलीला जातोय. शिवसेनेचं मुंबईतलं पथक घेऊन तिकडे जाणार आहे. आमचे सांगलीचे निवडणूक समन्वयक आदित्य शिरोडकर, मी आणि आमची मुंबई-पुण्यातली पथकं सांगलीत ठाण मांडून बसणार आहोत. पुढील चार ते दिवस मी पूर्णवेळ सांगलीत असेन. तिथल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. तिथल्या शिवसेना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मी भेटणार आहे. त्याचबरोबर मविआच्या प्रमुख नेत्यांना भेटणारदेखील आहे.

हेही वाचा :

15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग होणार बंद? 

चिप्सच्या पुड्यांनी सजवली नवरदेवाची गाडी : Viral Video

जावयाने कापली सासूची उमेदवारी; भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी