सांगली हादरली! भाजप नेत्याची भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख तथा भाजप नेते सुधाकर खाडेंची भररस्त्यात हत्या(death) करण्यात आली आहे. या घटनेनंतर सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. खाडे हे भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते.

शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या घटनेनंतर त्यांना तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत(death) घोषित केले.

घटनेबाबत माहिती मिळताच मिरज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याचं देखील बोललं जातंय. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत ही घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात निवडणूक अगदी तोंडावर आली असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेबाबत आता अधिकचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

नागरिकांना पुन्हा लावावे लागणार मास्क, कारण…

‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार

निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं