शिंदे गटात भूकंप होण्याचे संकेत संजय राऊत यांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं

शेअर बाजार वाढला म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही. महागाई,(earthquake) बेरोजगारी आणि चीनची घुसखोरी हे प्रश्न अजूनही अस्वस्थ करत आहेत. त्यावर मोदी काहीच बोलताना दिसत नाहीत. ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत. मोदी आणि शाह यांचं हे सरकार व्यापारी आणि कार्पोरेट उद्योगपतींचंच आहे, हे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिंदे गट आणि अजितदादा गटाला या निवडणुकीत मोठं नुकसान सोसावं लागल्याने या दोन्ही गटात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही गटाचे आमदार या निकालाने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे हे आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे ही अस्वस्थता अधिकच वाढताना दिसत आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. आमदार संपर्कात आहेत, ते असं सांगायचं असतं का?, असं उत्तर देत संजय राऊत यांनी सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात शिंदे गटाला(earthquake) राजकीय भूकंपाचे हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. पळून गेलेल्यांना आपण निवडून येणार नाही हे कळून चुकलं आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून मजबुतीने पुढे जात आहोत. जे पळून गेले, जे बेईमान झाले, त्यातील काही लोकांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. त्यांचे संदेश आणि मनातील अंतरंग बाहेर येत आहेत. आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. त्या तरंगाचं काय करायचं ते बघू, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

विधानसभेत वचपा काढू

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं आहे. आम्हाला 30 जागा मिळाल्या हे मोठे यश आहे. किमान सात ते आठ जागा जोर जबरदस्ती आणि पैशाच्या जोरावर मिळवल्या. प्रशासनावर दबाव टाकून चोऱ्यामाऱ्या आणि लांड्यालबाड्या करून मिळव्या आहेत. नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे, त्यांना दहा जागा मिळाल्या नसत्या. पण आम्ही विधानसभेत याचा वचपा काढू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपचे आभार मानतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संविधानाचं दर्शन घेतलं. त्यावरही राऊत यांनी टीका केली. हे नाटक आहे. ढोंग आहे. लोकांनी त्यांना झिडकारलं, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना (earthquake)लोकांनी झिडकारलं. नंतर त्यांना संविधानाची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मी आभार मानतो, असा टोला त्यांनी लगावला.

हे सरकार टिकणार नाही

हे सरकार खरोखर टिकणार नाही. भूपेश बघेल आता बोलत आहेत. हे मी निकाल लागल्यापासून बोलत आहे. हे सरकार टिकणार नाही. कोणी काही करू द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहिती आहे, त्यांचे चेहरे बघा. त्यांचा चेहरा सांगत आहे. म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात करायचा. आपल्याबरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून द्यायचा. लाखो करोडो हजारो शेकडो कोटी रुपयांचा चुना लावायचा आहे हे यांचं धोरण दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शेअर बाजार घोटाळ्यातील लाभार्थी कोण?

शेअर बाजारातील घोटाळयावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सेन्सेक्स स्टॉक, एक्सचेंज स्टॉक मार्केट, शेअर बाजार घोटाळा जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून चालू आहे. गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत आहेत. राजा जेव्हा व्यापारी असतो, तेव्हा प्रजा भिकारी असते. कालचा स्टॉक एक्झिट पोलनंतर कसा वाढला? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंजमधल्या घोटाळ्याची माहिती दिली. 30 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं राहुल म्हणाले. त्यांनी संयुक्त संसदीय समिती मार्फत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर शेअर बाजारात अचानक कृत्रिम वाढ दाखवण्यात आली आहे. या घोटाळ्यातील लाभार्थी कोण आहेत? हे उघड झालं आहे. भाजपला मदत करणारे उद्योगपती आणि राजकारणी या घोटाळ्याचे लाभार्थी आहेत. हा घोटाळा सरकारच्या स्थापनेपासूनच आहे, असंही ते म्हणाले. मोदी देश सेवेच्या गप्पा मारत आहेत. पण त्यांची तिसरी टर्म ही देश सेवेसाठी नसून कार्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी आहे. हे आता स्पष्ट झालं आहे, असा दावा राऊत यांनी केला.

हेही वाचा :

‘या’ भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

अजितदादांचा फैसला काय; NDA मध्ये राहणार की काकांच्या गोटात जाणार?