संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते डिप्रेशनमध्ये: भाजप नेत्याचा जोरदार हल्लाबोल
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-407.png)
शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवड़णुकीनंतर जोरदार राजकारण(current political news) रंगले आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपने राज्यस्तरीय बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-356-853x1024.png)
आज भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनापूर्वी भाजप(current political news) खासदार नारायण राणे यांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
खासदार नारायण राणे यांनी खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य आकाला वाचवण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. यावरुन नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, अस सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले की, “संजय राऊतची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका. शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होता. कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होता. कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता. हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्याला कामधंदा नसल्याने बोलायला लावतात”, अशा शब्दात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.
त्याचबरोबर बीड हत्या प्रकरणावरुन देखील खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “हे सरकार कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगाराला तर मुळीच नाही. चौकशी करून पुरावे गोळा केले जातात आणि त्यानंतर कारवाई केली जाते. हे संजय राऊतला माहित नाही, त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं”, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत भांडण सुरु असून शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली असल्याची चर्चा सुरु आहे. यावर खासदार नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आधी दोन्ही हातवर करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार. त्यांच्या स्वबळाची ताकद राहिली नाही. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात याने गमावलं. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे मत भाजप खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
भाजपचं नवं मिशन विरोधकांचं टेन्शन वाढवणार; बावनकुळेंनी दिले सर्व मंत्र्यांना हे आदेश
‘…तर मी निवडणूक लढवणार नाही’; विधानसभेच्या तोंडावर केजरीवालांनी डाव टाकला
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? स्टार गोलंदाजाच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट