मंडलिकांच्या वादग्रस्त विधानावरून संजय राऊत कडाडले

कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही छत्रपतींच्या गादीचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, अशा इशारा दिलाआहे.