संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्रिकेट विश्वात खळबळ

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची(cricket) घोषणा झाली, पण त्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे नाव नाही. संजू केरळकडून विजय हजारे ट्रॉफी खेळत नसल्याने त्याची निवड झाली नसल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता संजू सॅमसनच्या वडिलांनी केरळ क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले आहेत.

संजूचे वडील विश्वनाथ सॅमसन(cricket) यांनी केसीएचे अध्यक्ष टीसी मॅथ्यू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जखमी संजूच्या वतीने रजा मागितली असता टीसी मॅथ्यू यांनी आपला अपमान केल्याचा आरोप विश्वनाथ सॅमसन यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वनाथ सॅमसन म्हणाले, “केसीए मध्ये असे काही लोक आहेत जे माझ्या मुलाच्या विरोधात आहेत. आम्ही यापूर्वी कधीही असोसिएशनच्या विरोधात बोललो नाही, परंतु यावेळी मी नक्की आवाज उठवणार. आता खूप झालं. संजू हा एकमेव खेळाडू नाही जो शिबिरात सहभागी झाला नाही.”

विश्वनाथ सॅमसन यांनी केसीए अध्यक्ष जयेश जॉर्ज आणि सचिव विनोद यांच्यावरही निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, “शिबिरात तीच परिस्थिती आहे. बाकीच्या खेळाडूंना खेळण्याची मुभा आहे. क्षुल्लक गोष्टींना मोठे करणारे जयेश जॉर्ज किंवा विनोद यांच्याबद्दल नाही.”

आपल्या भावना व्यक्त करताना विश्वनाथ सॅमसन म्हणाले, “आम्ही फक्त खेळाडू आहोत, आम्हाला खेळाच्या राजकारणात रस नाही. माझ्या मुलाला खेळण्याची चांगली संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. जर काही चूक असेल तर आम्ही चर्चा करून ती सुधारण्यास तयार आहोत.”

गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली होती. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होईल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. संजूने स्पर्धेसाठी केरळच्या तयारी शिबिरात भाग घेतला नव्हता, त्यानंतर त्याची निवड झाली नाही. आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील संधी न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

‘करेक्ट कार्यक्रम करतो…22 तारखेला’; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

महाकुंभला हॅरी पॉटरची हजेरी? व्हायरल Video पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

बाप रे! फोटो काढण्यासाठी वाघाजवळ गेला अन्…; पुढे जे झालं तुम्ही पहा, VIDEO व्हायरल