संजू सॅमसनचे वडील धोनी-कोहली, रोहित आणि द्रविडवर भडकले

भारताचा संघ(team india) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहे. टीम इंडियाने चार सामान्यांच्या मालिकेत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दोन सामान्यांच्या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने याआधी बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये सुद्धा कमालीची कामगिरी करत मालिका एकतर्फी जिंकली होती.

या दोन्ही मालिकेमध्ये भारताच्या संघाचा(team india) फलंदाज संजू सॅमसन स्टार बनला. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणारा संजू सॅमसन काही काळापासून टीम इंडियाचा भाग आहे. मात्र, वेळोवेळी सोशल मीडियावर त्याला संघामध्ये स्थान न मिळाल्यामुळे ट्रेंड होत असतो. त्याचे नाव संघात नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

संजूने गेल्या एका महिन्यात T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन शतके झळकावली असली तरी गेल्या दोन सामन्यांमध्ये तो शून्यावरही बाद झाला आहे. दरम्यान, संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या मुलाचा वेळ वाया घालवल्याबद्दल माजी कर्णधारांवर आरोप केले आहेत. मुलाखतीत विश्वनाथ म्हणाले, “असे 3-4 लोक आहेत ज्यांनी माझ्या मुलाच्या महत्त्वाच्या कारकिर्दीची 10 वर्षे उध्वस्त केली… धोनी जी, विराट जी, रोहित जी आणि प्रशिक्षक द्रविड जीसारखे कर्णधार.”

संजू सॅमसनने 2015 मध्ये खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, पदार्पण केल्यानंतर खराब फॉर्म आणि सांघिक संयोजनामुळे तो संघाचा नियमित सदस्य होऊ शकला नाही. मात्र, २०२१ पासून त्याला सातत्याने संधी मिळत आहेत.

ते पुढे म्हणाले, “या चौघांनी माझ्या मुलाच्या आयुष्यातील 10 वर्षे उध्वस्त केली. पण त्यांनी त्याला जितका त्रास दिला तितकाच तो बाहेर पडला.” सॅमसनच्या वडिलांनी नवा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही सॅमसनला संधी दिल्याचे श्रेय दिले.

संजू सॅमसनने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने भारतीय मैदानावर शतक झळकावले. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने पुन्हा सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आणि अनेक विक्रम नावावर केले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शेवटचा T२० सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला या मालिकेमध्ये जर विजय मिळवायचा असल्यास टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामन्यात विजय मिळवल्यास मालिकेचा निकाल अनिर्णयीत राहील.

हेही वाचा :

मोठी बातमी! महायुतीला खिंडार, अनेक भाजप कार्यकर्ते पवारांच्या पक्षात

“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे