संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, Video Viral

22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे (team india) खेळाडू वेगवेगळ्या बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला(team india) ही मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावीच लागेल. या मालिकेतील पहिला सामना पर्थ स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल आणि ध्रुव जुरेल आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आता टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. यावेळचा त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आईसोबत दिसत आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऋषभ पंत बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. यावेळी तो त्याच्या आईसोबत एअरपोर्टवर दिसला. यावेळचा त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. बुधवारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी ऋषभ पंतने एअरपोर्टवर आईचे आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार अपघातानंतर ऋषभ पंतचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे.

जर भारतीय टीमला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर ही सीरिज कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिका पराभवामुळे, भारताची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता धोक्यात आली आहे.न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे कारण टीम इंडियाची गुणांची टक्केवारी घसरली आहे.

भारतीय संघाची टक्केवारी 58.33% पर्यंत घसरली, ज्यामुळे ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत. आता टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला किमान 4 सामन्यांमध्ये पराभूत करावे लागेल.

हेही वाचा :

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशी होणार धनवान

सिनेसृष्टीतील बडा नेता अजितदादांच्या भेटीला; चर्चांना उधाण

विधानसभेतही ‘सांगली पॅटर्न’,  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन