“सरपंच हत्याकांड: वाल्मिक कराड-घुले प्रकरणातील मोठी अपडेट”
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (social issues)यांच्या हत्या प्रकरणाला आता महिना उलटला आहे. मात्र, अजूनही याचा संपूर्ण खुलासा झालेला नाही. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील मास्टरमाईंड असल्याचा आरोप असणारा वाल्मिक कराड हा देखील तुरुंगात आहे. सीआयडी आणि एसआयटीकडून या हत्याकांडचा तपास केला जात आहे. अशात एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे दोघेही हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय6 डिसेंबररोजी मस्साजोगला जाताना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता, अशी माहिती आहे. 6 डिसेंबररोजी घुले आणि कराड यांच्यात दोन वेळा फोनवर संवाद झाल्याची माहिती (social issues)आहे. संतोष देशमुखांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. यानंतर 9 डिसेंबररोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, वाल्मिक कराडवर सध्या फक्त 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या खंडणी प्रकरणी देखील सीआयडीला एक महत्वाचा पुरावा सापडला आहे. सीआयडीला एक कॉल रेकॉर्डिंग हाती लागली आहे. कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याची एक रेकॉर्डिंग सीआयडीला मिळाली आहे. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे.
आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे. 2 कोटींच्या खंडणीसाठी कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. विष्णू चाटेच्या मोबाइलवरून हा कॉल करण्यात आला होता. त्यावेळी विष्णू चाटेने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना सांगितले होते. वाल्मिक कराडने शिंदे यांना सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती.
त्याचदिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहचला. काम बंद करा, नाहीतर तुमचे हातपाय तोडू. काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले. (social issues)याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले.याचाच तपास आता सीआयडी करत आहे. कराडच्या वॉइस सॅम्पलची आणि त्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा :
‘मी फक्त हिंदू मतावरच निवडून आलो,’ नितेश राणेंचे मोठे विधान!
विराट-अनुष्काचा प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत, अनुष्काने विचारलेले सवाल आणि महाराजांचे उत्तर
‘आय लव्ह यू’ असा मेल केला, रिप्लाय न मिळाल्यावर शिवाली परबनं सांगितले जबरी चाहत्यांचे किस्से