सरंपच संतोष देशमुखांचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, VIDEO

बीडच्या मस्साजोग गावात ९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख(video) यांची हत्या झाली. देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीने १ मार्च रोजी आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रातून देशमुखांच्या हत्येच्या वेळचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता देशमुखांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ शेवटचा असल्याचं बोललं जात आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करण्याआधी आरोपींनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवर आरोपींनी हत्येचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. हत्येचे क्रूर फोटो आणि(video) व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं. संतोष देशमुख यांचा अमानुष छळ करून हत्या केल्याचे फोटो आणि व्हिडिओमधून समोर येत आहे. आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाणीदरम्यान एका आरोपीने लघुशंका देखील केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे.

देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतोष देशमुख यांना सत्कारासाठी बोलावलं होतं. ते तहसिलदारांच्या सोबत बसलेले दिसत आहे. या व्हिडिओतून (video) ते शांत स्वभावाचे दिसत आहेत. बीडमधील अनेक जण त्यांच्या साधेपणाचे कौतुक करतात. मात्र, शांत स्वभावाच्या व्यक्तीला का मारलं, असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे.
संतोष देशमुख यांनी एका सत्कारासाठी तहसिलदारांची भेट घेतल्याचे दिसत आहे. त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या हत्येचा आहे. अनेक जण व्हिडिओ पाहून लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
UPSC अंतर्गत विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज!
अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्यविक्रेत्यांचे टेन्शन!
आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी