सरपंचाच्या डोक्यात सैतान घुसला २ बहिणींवर अत्याचार केला आजीने केली मदत

गावचे प्रश्न सोडविणारा कारभारीकडूनच संतापजनक कृत्य झाल्याचे समोर (administrator)आले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एक गावात मुलींच्या आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच पदाला काळिमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे. चांदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागु कोल्हे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रम्हगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक, शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. यासाठी त्याने मुलींच्या(administrator) आजीचीच मदत घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्या सोबत मुलींना जाण्यास सांगितले, मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला. यामुळे आजीने चिडून हाताचापटीने मुलींना मारहाण करुन दोघींना चावा घेतला. इतकेच नाही तर शिवीगाळ दमदाटी करुन दोघीना घरात कोंडून ठेवले होते. अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ(administrator)यांच्याकडे दिली.
यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागु कोल्हे, साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तीघाविरोधात बालकांचे लैगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?