कोल्हापूर पुणे टोलविरोधात सतेज पाटील पृथ्वीराज चव्हाण विश्वजीत कदम आक्रमक
कोल्हापूर-पुणे या महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. पावसामुळे (highway)आधीच काम सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कोल्हापूर-पुणे प्रवास करताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास होत असताना आणि रस्त्याचे काम सुरु असताना टोल घेणे चुकीचे आहे. वाहनधारकांकडून टोल घेतला जाऊ नये, अशा विविध मागण्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली आहे.तर येत्या शनिवारी 3 ऑगस्ट टोलच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या घोषणेमुळे आता पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
सातारा ते कोल्हापूर या महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. पावसामुळे आधीच काम सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचा खूप वेळ वाया जात आहे.प्रवाशांची होणारी गैरसोय आणि तरीही वसूल केला जाणार टोल या मुद्द्यांवर आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. रस्त्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, (highway)जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी आज ‘व्हिसी’द्वारे मिटिंग घेतली.
या मिटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर आता कोल्हापूर ते सातारा प्रवास करण्यासाठी सुमारे चार तास लागतात. प्रवाशांना त्रास होतो. काम सुरु असताना टोल घेणे चुकीचे असून तो घेतला जाऊ नये यासाठी शनिवारी मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच तर टोल न देताच वाहने मोफत सोडावी, रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा आणि रस्ता होईपर्यंत टोल आकारणी नको, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.तसंच कामं सुरु असताना टोल घेतला जावा का? याबाबत कायदा तपासाला पाहिजे. रस्त्याच्या कामामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे किमान कामं होईपर्यंत टोल आकारला जावू नये. आंदोलनात सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील, आंदोलनास आमचा पाठिंबा असेल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
रस्त्याच्या कामात दिरंगाई सुरु असतानाही टोल आकारणी सुरु आहे. याबाबत जन आंदोलन उभारलं पाहिजे. त्यासाठी सांगली काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचं आमदार विश्वजित(highway) कदम यांनी सांगितलंतर टोल विरोधातील आंदोलन हे कोल्हापूर-किणी टोल नाका, कराड-तासवडे टोल नाका आणि सातारा-आनेवाडी टोल नाका या ठिकाणी करण्यात येणार आहे. यावेळी कोणतेही वाहने अडवण्याचे नाही, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन आंदोनकर्त्यांना काँग्रेस नेत्यांनी केलं आहे.
हेही वाचा:
कोल्हापूर सतर्क राहा राधानगरीचे 7 दरवाजे उघडले त्यात 2 दिवस ऑरेंज अलर्ट!
रोहित शर्मा मोठ्या अडचणीत गंभीर आरोपाने खळबळ
खुशखबर! 65 हजार रुपयांहून स्वस्त झालं प्रति तोळा सोनं