तो गेला, त्याला वाचवा, रस्ता क्रॉस करताना पाण्याच्या प्रवाहात मुलगा वाहून गेला Video

चंद्रपूर: राज्यभर पावसाचा(water) जोर वाढल्याने पर्यटन स्थळांवर गर्दी देखील वाढली आहे. त्याचबरोबर पाण्यात उतरण्याच्या मोहात मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या परिस्थितीत चंद्रपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एक १३ वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलम गावातील रुणाल बावणे हा मुलगा(water) पूर बघण्यासाठी गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पुलाकडे गेला होता. परतताना पाण्याच्या प्रवाहात त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने पाण्यात उडी देखील घेतली, पण तोवर उशीर झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेले आर्त हाक देत होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नागभीड पोलीस घटनास्थळी पोहोचत शोध मोहीम सुरू केली आहे, पण अद्याप मुलाचा मृतदेह सापडला नाही.

चंद्रपूर जिल्ह्याला सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळपास सहाशे घरांची पडझड झाली आहे आणि शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

नागभीड-नागपूर हायवे हा मुख्य मार्ग पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाला आहे. इतर मार्ग देखील पावसाच्या पाण्यामुळे बंद पडले होते, पण पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर ते मार्ग मोकळे झाले आहेत. घरांचे नुकसान आणि शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत.

पावसाच्या माऱ्याने पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील एका घराची भिंत कोसळल्याने पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागभीड तालुक्यातील विलम गावचा रहिवासी रोनाल्ड पावणे हा दहा वर्षाचा मुलगा विलम रोडनजीकच्या नाल्यात वाहून गेला आहे. तर बोथली येथील नाल्यात स्वप्निल दोनोडे याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे.

हेही वाचा :

हार्दिक पांड्याचा एकीकडे नताशासोबत घटस्फोट तर दुसरीकडे नवा बिझनेस!

मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; ‘या’ 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू

देशाच्या राजधानीत टोमॅटोनं केलं ‘शतक’, मुसळधार पावसाचा दरावर परिणाम